नवीन X3 कार BMW च्या CLAR (क्लस्टर आर्किटेक्चर) प्लॅटफॉर्म वर आधारित आहे.
BMW ने 2018 ऑटो एक्सपो मध्ये थर्ड जेनरेशन च्या X3 ला सादर केले होते आणि आता लॉन्च ची तारीख समोर आली आहे. कंपनी ने सांगितले की नवीन कार X3 19 एप्रिल, 2018 ला भारतता लॉन्च केली जाईल. नवीन X3 कार BMW च्या CLAR (क्लस्टर आर्किटेक्चर) प्लॅटफॉर्म वर आधारित आहे. हिची लांबी 4,716 mm , रुंदी 1,897 mm आणि उंची 1676 mm आहे. कारच्या बाहेरील डिजाइन मध्ये खुप बदल करण्यात आला आहे, ज्यात किडनी ग्रिल आणि रिडिजाइन हेडलँप्स चा समावेश आहे. वाइड एयर डॅम सह नवीन फ्रंट बम्पर सोबत आयताकार LED फॉग लँप्स देण्यात आले आहेत. X3 च्या इंटीरियर डिजाइन बद्दल बोलायचे झाले तर हिचा डॅशबोर्ड नव्या डिजाइन सह येत आहे. सोबत फ्लोटिंग टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टम आहे. याव्यतिरिक्त हिच्यात अॅप्पल कार प्ले आणि एंड्रॉयड सपोर्ट पण आहे. X3 च्या मल्टीफंक्शन स्टीयरिंग व्हील ला पण अपडेट करण्यात आले आहे. पण बीएमडब्लू ने भारतात लॉन्च होणार्या X3 कार मधील इंजिन बद्दल कोणतीही घोषणा केली नाही, पण हिच्यात 188 बीएचपी आणि 400 एनएम सह 2.0-लीटर, 4 सिलेंडर डीजल इंजिन असण्याची शक्यता आहे. इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्स आणि ऑल-व्हील ड्राइव सिस्टम सह पेयर्ड असेल. अंदाज लावला जात आहे की कंपनी आपल्या नव्या X3 ची किंमत आधीच्या मॉडेल पेक्षा जास्त ठेवेल.