Happy New Year 2025 Wishes: नुतनवर्षाच्या शुभप्रसंगी प्रियजनांना द्या हटके शुभेच्छा! WhatsApp स्टेटस, फोटोज, AI स्टिकर्स 

Happy New Year 2025 Wishes: नुतनवर्षाच्या शुभप्रसंगी प्रियजनांना द्या हटके शुभेच्छा! WhatsApp स्टेटस, फोटोज, AI स्टिकर्स 
HIGHLIGHTS

2024 ला निरोप देऊन अखेर 2025 या नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे.

नववर्षानिमित्त आपण सर्वच नवा उत्साह, नवी ऊर्जा, नवीन ध्येय आणि नवा संकल्प ठरवतो.

WhatsApp वर नवीन वर्षाच्या द्या मराठीतून अप्रतिम आणि सुंदर शुभेच्छा!

Happy New Year 2025 Wishes: अखेर 2025 या नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. नववर्षानिमित्त आपण सर्वच नवा उत्साह, नवी ऊर्जा, नवीन ध्येय आणि नवा संकल्प ठरवतो. या शुभप्रसंगी अनेक जण आपले कुटुंब किंवा मित्र परिवारासह पार्टीचे किंवा फिरायला जाण्याच्या योजना बनवतात. नवीन वर्ष सुख समाधानाने आणि भरभराटीने जाओ, अशी इच्छा सर्वांचीच असते. त्यामुळे लोक नव्या वर्षाचे स्वागत अगदी उत्साहात करतात. तसेच, तुमच्या प्रियजनांना अनेक अप्रतिम आणि सुंदर अशा शुभेच्छा देऊन नवे वर्ष साजरा करा. WhatsApp वर नवीन वर्षाच्या द्या मराठीतून अप्रतिम आणि सुंदर शुभेच्छा!

Also Read: BSNL New Plan 2025: नववर्षाचे स्वागत करताना कंपनीने लाँच केले दोन नवीन प्लॅन्स, स्वस्तात दररोज 3GB पर्यंत डेटा

Happy New Year 2025 Wishes in Marathi

  • नवीन आशा आणि स्वप्न घेऊन आलेलं हे वर्ष, तुमचं जीवन यशाने भरून टाको, तुमच्या वाटेतील प्रत्येक अडथळा दूर होवो, तर आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने उजळून निघो. हॅपी न्यू इयर
  • नवे वर्ष तुमच्यासाठी शुभ ठरो, तुमचं आयुष्य सुखद आणि संपन्न राहो, प्रत्येक नवा क्षण नव्या स्वप्नांनी भरलेला असो, तुमच्या यशाचा मार्ग सुकर होवो. हॅपी न्यू इयर
  • नवीन वर्ष तुम्हाला नवीन प्रेरणा देईल, तुमच्या प्रत्येक इच्छेला सत्याचा मार्ग दाखवेल, संपूर्ण जीवन आनंदाने भरून टाकेल, तुमचं यश सतत वाढत जावो. हॅपी न्यू इयर
Happy New Year 2025
  • गेलं ते वर्ष, गेला तो काळ. नव्या आशा-अपेक्षा घेऊन आले 2025 साल! नूतनवर्षाभिनंदन
  • नवे स्वप्न, नवे वारे, नव्या आशा घेऊन आलेत नवे तारे, जग जिंकायचे ध्येय ठेऊन 2025 चे स्वागत करूया सारे.
  • येवो समृद्धि अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नव वर्षाच्या या शुभदिनी..!
  • इडा, पीडा टळू दे आणि नवीन वर्षात माझ्या मित्र परिवाराला काय हवं ते नक्की मिळू दे. नव्या वर्षाच्या मनापासून शुभेच्छा!
  • पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी उम्मेद, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा! नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
  • जुने विसरून करूयात नवी सुरुवात, नवीन वर्ष घेऊन आलं आहे नवी पहाट. नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • आनंदाचे क्षण, आरोग्याचा आशीर्वाद आणि यशाचे फुलणारे स्वप्न 2025 मध्ये तुमच्या जीवनात येवो. नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा!
  • तुमचा प्रवास आनंद, प्रेम आणि हास्याने सजो, तर प्रत्येक दिवस आनंदाचा अध्याय असू दे. नूतनवर्षाभिनंदन!
  • चला मिळून या नव्या वर्षाचे स्वागत करूया, जुन्या स्वप्नांना आणखी नव्याने फुलुवुया… नववर्षाभिनंदन!
  • जुने वर्ष सरले, काय कराल? हेच आहे निसर्गनियम! पूर्वीच्या आठवणींत चिंतेत राहण्यात अर्थ नाही. नव्या वर्षाचा आनंदाने स्वीकार करा!
  • नव्या वर्षात आपले मित्रत्व अधिक गाढ होवो, वर्ष येतो आणि जातो, पण मित्रत्व सदैव फुलत राहो. 2025 चे वर्ष शुभ होवो.
  • सर्वांच्या हृदयात असू दे प्रेमाची भावना, नव्या वर्षात पुरी होऊ दे अधुरी ही कहाणी, हीच प्रार्थना करते होऊन नतमस्तक. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • हे आपल नातं असंच राहू दे, मनात आठवणींची ज्योत अखंड तेवत राहू दे, खूप सुंदर असा प्रवास होता 2024 या वर्षाचा, 2025 मध्येही अशीच सोबत कायम राहू दे. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

WhatsApp स्टेटससाठी व्हीडिओ डाउनलोड करा.

  • सर्वप्रथम सोशल मीडियावरील तुम्हाला आवडलेल्या ‘हॅपी न्यू इयर’ व्हीडिओची लिंक कॉपी करा.
  • आता गुगल सर्चवर जाऊन युट्युब व्हीडिओ डाउनलोड किंवा इंस्टाग्राम व्हीडिओ डाउनलोड असे सर्च करा.
  • यानंतर तुम्हाला व्हीडिओ डाउनलोड करण्यसाठी स्क्रीनवर अनेक मोफत साईट्स दिसतील.
  • एखादी योग्य साईट निवडून ओपन करा आणि त्यामध्ये तुमच्या आवडत्या व्हीडिओची लिंक पेस्ट करा.

अशाप्रकारे सोप्या प्रक्रियेने तुम्ही मोफतमध्ये व्हीडिओ डाउनलोड करा. हा व्हीडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल, जो तुम्ही WhatsApp स्टेटसवर ठेऊ शकता.

Happy New Year 2025

Meta AI द्वारे नवनवर्ष शुभेच्छांचे फोटोज आणि AI स्टिकर्स तयार करा.

आपणा सर्वांना माहितीच आहे की, Meta AI फीचर WhatsApp आणि Instagram वर उपलब्ध आहे. याद्वारे अनेक माहिती आणि फोटो, स्टिकर्स बनवण्याचे कार्य सहज करू शकता.

  • सर्वप्रथम तुमच्या डिव्हाइसमध्ये WhatsApp ओपन करा.
  • आता तुम्ही होम पेजच्या वरच्या उजव्या बाजूला Meta AI चा ब्लु आयकॉन दिसेल.
  • या ब्लु आयकॉनवर क्लिक करा आणि आता तुम्ही Meta AI ला कमांड देऊ शकता. उदा. Happy New Year 2025 Wishes Images
  • यानंतर, Meta AI एक फोटो तयार करेल आणि तुम्हाला देईल.

अशाप्रकारे, तुम्ही Meta AI ला कमांड देऊन स्टिकर्स देखील मिळवू शकता. Happy New Year 2025 Images तुम्हाला मेटा AI द्वारे कस्टमाइज करून घेता येतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo