Childrens Day Wishes 2024: बालदिनानिमित्त चिमुकल्यांना द्या उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा, WhatsApp फोटोज, Videos, AI स्टिकर्स

Updated on 14-Nov-2024
HIGHLIGHTS

दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी 'बालदिन' साजरा केला जातो.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो.

WhatsApp द्वारे बालदिनाच्या 10+ शुभेच्छा प्रियजनांना पाठवा.

Childrens Day Wishes 2024: दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी ‘बालदिन’ साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आजच्या दिवशी बालदिन साजरा केला जातो. आपणा सर्वांना माहितीच आहे की, पंडित नेहरू यांचा लहान मुलांवर खुओ जीव होता. एवढेच नाही तर, लहान मुले सुद्धा त्यांना ‘चाचा नेहरू’ असे संबोधतात. शाळांमध्ये शालेय विद्यार्थी ‘या’ दिवशी एक छोटासा कार्यक्रम करून पंडित नेहरू यांना अभिवादन करतात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला बालदिनाच्या 10+ शुभेच्छा सांगणार आहोत, ज्या तुम्हाला WhatsApp द्वारे तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता.

Also Read: Smartwatches तुमच्या मुलांसाठी सुरक्षित आहेत का? जाणून घ्या फायदे आणि सर्वोत्तम पर्याय

Childrens Day Wishes 2024

  • प्रत्येक मूल आहे खास, मोठे होऊन नक्कीच करणार जगाचा विकास, बालदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  • मुले आहेत देशाच्या प्रगतीचा आधार, मोठी होऊन करणार चाचा नेहरूंची स्वप्नं साकार, बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • आम्ही चाचा नेहरूंची लाडकी मुले, पालकांचीही प्रिय मुले, तो पुन्हा एकदा आला आहे. चाचा नेहरूंचा वाढदिवस चला एकत्र साजरे करूया, बालदिन. बालदिनाच्या शुभेच्छा!
  • थोडा टेंशनला ब्रेक देऊया, रोजचं काम थोडं दूर ठेवूया, तर्कबुद्धीला आराम देऊया, आज थोडं लहान होऊया. बालदिनाच्या शुभेच्छा!
  • बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण, बालपणीच्या आठवणीत हरवते मन, कधीच येणार नाहीत ते निरागस क्षण, बालदिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
  • मुलं म्हणजे पाखरांची चपळता, मुलं म्हणजे पाटेची सौम्य उज्ज्वलता मुलं म्हणजे झऱ्याचा खळखळाट, मुलं म्हणजे आनंद उत्साहाचा स्त्रोत, बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता, खेळण्याची मस्ती होती, मन निरागस, वेडे होते, कल्पनेच्या दुनियेत जगत होतो, बालपणचे ते दिवस खरंच सुंदर होते, बालदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
  • खऱ्याखुऱ्या लहानग्यांसोबतच, तुम्हा आम्हामध्ये दडलेल्या छोट्या बाळाला देखील बालदिनाच्या शुभेच्छा!
  • वयाने मोठे पण मनाने लहान असलेल्या प्रत्येकाला बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • जगातील सर्वोत्तम वेळ, जगातील सर्वोत्तम दिवस, जगातील सर्वात सुंदर क्षण फक्त बालपणातच मिळतात. बालदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

‘अशा’प्रकारे डाऊनलोड करा स्टेटससाठी Videos

  • सर्वात आधी सोशल मीडियावरील तुम्हाला आवडलेल्या बालदिनाच्या व्हीडिओची लिंक कॉपी करा.
  • त्यानंतर गुगल सर्चवर जाऊन युट्युब व्हीडिओ डाउनलोड किंवा इंस्टाग्राम व्हीडिओ डाउनलोड अशाप्रकारे सर्च करा.
  • तुम्हाला व्हीडिओ डाउनलोड करण्यसाठी स्क्रीनवर अनेक मोफत साईट्स दिसतील.
  • एखादी योग्य आणि विश्वासू साईट निवडून ती ओपन करा आणि तुमच्या आवडत्या व्हीडिओची लिंक पेस्ट करा.
  • या अगदी सोप्या प्रक्रियेने तुम्ही मोफतमध्ये व्हीडिओ डाउनलोड करा. हा व्हीडिओ तुमच्या फोनच्या डाऊनलोड्स विभागात किंवा गॅलरीमध्ये सेव्ह होईल. आता फोनच्या गॅलरीद्वारे हा व्हीडिओ तुम्ही तुमच्या WhatsApp साठी Status वर ठेऊन तुमच्या प्रियजनांना बालदिनाच्या भारी शुभेच्छा देऊ शकता.

Meta AI द्वारे बालदिनाच्या शुभेच्छांसाठी फोटोज तयार करा.

Meta AI फीचर WhatsApp आणि Instagram वर उपलब्ध आहे. यावर कमांड देऊन तुम्ही Childrens Day Wishes 2024 इमेजेस तयार करू शकता.

  • डिव्हाइसमध्ये WhatsApp ओपन केल्यास होम पेजच्या वरच्या उजव्या बाजूला Meta AI चा ब्लु आयकॉन दिसेल.
  • या ब्लु आयकॉनवर क्लिक करून तुम्ही Meta AI ला कमांड द्या. उदा. Childrens Day Wishes 2024
  • आता Meta AI एक फोटो तयार करेल आणि तुम्हाला देईल. तुम्ही Meta AI ला कमांड देऊन हे Childrens Day Wishes 2024 इमेजेस कस्टमाइज करून घेऊ शकता. अशाप्रकारे तुम्ही Meta AI ला कमांड देऊन स्टिकर्स देखील बनवू शकता.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :