PUBG Mobile गेम खेळता येत नाही? इथे जाणून घ्या कशाप्रकारे खेळायचा हा गेम
PUBG मोबाईल गेम आजकाल मोठयाप्रमाणावर पुढे येत आहे, जर तुम्ही अजून हा खेळाला नसेल आणि खेळू इच्छित असाल तर आज आम्ही तुम्हाला हा तुम्ही गेम कशाप्रकारे खेळू शकता हे सांगणार आहोत, आणि जर तुम्ही आधीपासून खेळात असाल तर अधिक चांगल्यारीत्या कसा खेळात येईल हेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तुम्ही नवीनच PUBG मोबाईल गेम खेळायला सुरवात केली आहे का? कि तुम्ही माझ्यासारखे आहेत ज्याला हा गेम चांगल्या प्रकारे खेळात येत नाही आणि जर तुम्ही खेळात जरी असलात तरी तुम्हाला तुमचा PUBG गेम प्ले इम्प्रूव करण्याबद्दल कोणतीच कल्पना नाही का? तुम्हाला याची चिंता करण्याची बिलकुल गरज नाही. आज आम्ही तुम्हाला याचा समस्येचे काही उपाय सांगणार आहोत. आम्ही तुम्ही तुम्हाला किंवा गेमच्या काही बेसिक गोष्टी सांगणार आहोत. चला तर मग सुरु करूया आणि जाणून घेऊया कि कशाप्रकारे तुम्ही तुमचा PUBG गेम प्ले सुधारू शकता ते.
हेडफोन्स वापरा!!!
आम्ही याचे जास्त महत्व सांगणार नाही. हा एक आरजीबी टोटिंग गेमिंग हेडसेट नसला तरी चालेल, कोणताही ओएल 'हेडफोन जो माइक सह येतो, तो चालून जाईल. यामुळे तुमच्या आसपासची जागरूकता वाढेल आणि तुमच्या आसपास कोणताही खेळाडू, वाहन किंवा बंदुकीचे आवाज तुम्हीच आरामात ऐकू शकाल. असे करण्यासाठी तुम्हला एका हेडफोनची नितांत गरज आहे. हा तुम्हाला तुमच्या साथीदारांशी बोलण्यास पण मदत करेल.
माइक्रोफोन तुमचा मित्र बनेल
डुओस किंवा स्क्वाड खेळताना, टीम मध्ये चॅट सुरु करा आणि आपल्या साथीदारांच्या संपर्कात राहा. 'टीम' आणि 'सर्व' यांमध्ये टॉगल करण्याचा पर्याय मिनी-मॅपच्या डावीकडे आहे. हे महत्वाचे आहे कारण तुम्ही तुमच्या योजना बनवू शकता इतरांना शत्रूच्या ठिकाणी बोलावू शकता किंवा मग मदत मग शकता.
मिनी-मॅप वर तुमची नजर ठेवा
मिनी-मॅप तुम्हाला काही आवाज जसे कि चालणे, वाहन किंवा बंदूकधाऱ्यांचे स्थान दाखवेल. तुम्हाला तुमची पुढील योजना बनवण्यासाठी याची मदत होईल. मग तुम्ही हल्ला करता, किंवा लपून राहता हे तुमच्यावर अवलंबून आहे. हे पण लक्षात घ्या कि तुमच्या साथीदारांनी केलेला आवाज मिनी-मॅप वर दिसत नाही.
तुमचा लँडिंग स्पॉट्स काळजीपूर्वक निवड
तुम्ही हा लेख वाचत आहात याचा अर्थ असा असू शकतो तुम्ही या खेळात नवीन असू शकता (निदान सध्या तरी). त्यामुळे कोणत्ययी प्रमुख लँडिंग स्पॉट मध्ये लँडिंग कारण्यापासून लांब रहा आणि काही घर असतील अशा वेगळ्या ठिकाणी उतारा. यामुळे तुम्हाला अगदी शांतपणे इतरांवर हल्ला करता येईल. तुम्हाला सर्वात चांगली लूट मिळत नसेल तर तुम्ही पुढल्या ठिकाणी जाऊ शकता आणि काहीतरी चांगले मिळेल अशी अपेक्षा करू शकता. काही मिनिटांतच मारण्यापेक्षा हे केव्हाही चांगले.
लोकांची उपस्तीथी ओळखा
सावधपणे एखाद्या ठिकाणी जाणे केव्हाही चांगले. जर तुम्हाला कोणीतरी एखाद्या ठिकाणी असल्याची शंका आल्यास, खिडक्या आणि आजूबाजूच्या क्षेत्रावर एक नजर टाका. उघडलेल्या दरवाज्यांवर नजर ठेवा. खेळ सुरु होताना सर्व दरवाजे बंद असतात, त्यामुळे उघडलेला दरवाजा दिसल्याच तिथून कोणीतरी येऊन गेला आहे (किंवा अजूनही तिथेच आहे) हे तुम्हाला समजेल. विचित्र प्रकारे पार्क केलेल्या वाहनांवर पण तुम्ही नजर ठेवली पाहिजे.
इंवेटरी इत्यादी वर नजर ठेवा
तुमच्या मनात पहिला विचार हत्यार, गोळ्या आणि लागणारे साहित्य घेण्याचा असावा. तुमच्या स्क्रीनच्या खालील डाव्या भागातील बॅकपॅक आइकन वर क्लिक करून तुम्ही तुमची यादी उघडू शकता आणि ज्या गोष्टींची तुम्हाला गरज नाही त्या तुम्ही टाकून देऊ शकता. अशा गोष्टी आणि गोळ्या ज्या तुम्ही तुमच्या सोबत असलेल्या हत्यारा सोबत वापरू शकत नाही त्या एका लाल रंगात दिसतील. तुम्ही त्या टाकून पण देऊ शकता. पण जर तुम्ही नवीन हत्यार शोधण्याची योजना बनवत असाल तर तुम्ही त्या गोळ्या सोबत ठेवल्या पाहिजेत.
शॉटगन आणि पिस्टल तुमच्या कामाच्या नाहीत
शॉटगन रीलोड होण्यास जास्त वेळ घेते, आणि पिस्टल पण काही जास्त उपयोगी पडत नाही. यांचा वापर तेव्हा करावा जेव्हा तुमच्यकडे काहीच नसेल. पिस्टल फक्त थोडीशी चांगली असते, पण तुमच्या हातात त्यापेक्षा चांगले हत्यार आल्यास तुम्ही तिला विसरून जातात. याला अपवाद म्हणजे फ्लेर गन. जी तुम्हाला मिळाली आणि तुम्ही ती आकाशाच्या दिशेने मारली तर तुमच्यासाठी खास ड्रॉप मिळेल.
तुमची हत्यारे जाणून घ्या
PUBG मोबाईल मध्ये प्रत्येक हत्याराचे आपापले फायदे आणि तोटे आहेत. सध्यातरी आम्ही तुम्हला एवढेच सांगतो कि – सबमशीन बंदुका छोट्या आणि माध्यम श्रेणीसाठी चांगल्या आहेत. यात टॉमी गन, यूएमपी, वेक्टर आणि यूजी यांचा समावेश आहे. एकेएम आणि एम 16 सारख्या राइफल्स बहुपयोगी आहेत आणि वेगवेगळ्या श्रेणीतील टार्गेट्स याने खाली पडत येतात. तुम्ही नवीन आहात हे लक्षात ठेवता तुमच्यासाठी हत्यारांची पुढील माहिती पुरे आहे. स्नाइपर राइफल्स भरपूर नुकसान करते, पण ती खूप स्लो फायर होते आणि तुम्हाला यासाठी एक स्कोप ची गरज असते. या मास्टर करण्यासाठी खूप स्किल्स लागतात. मिनी 14, एसकेएस आणि एसएलआर सारख्या डीएमआर अटॅकिंग राइफल आणि स्नाइपर्स च्या मध्ये येतात. त्या हाय पावर स्कोप वापरू शकतात आणि लवकर फायर होतात. जर तुम्ही स्नाइपिंग वर तुमचे हाथ अजमवू पाहत असाल तर पुढील बंदुका तुम्हाला उपयोगी पडतील. डीपी -28 आणि एम 249 सारखे एलएमजी भरपूर शक्तिशाली हत्यार आहेत. जर तुम्हाला असे हत्यार मिळाले (एम 249 फक्त एयरड्रॉप मधून मिळते) तर तुम्ही ते घेतले पाहिजे. त्यांच्यात क्विक फायर रेट, मोठी मॅगझीन आहे आणि युद्धात त्यांचा चांगला वापर होतो.
स्मार्ट बना
तुम्हाला हे आधीपासून माहितीच असेल कि तुम्ही नेहमी सेफ झोन मध्ये राहिले पहिले. जास्त काळ जर तुम्ही निळ्या क्षेत्रात राहिलात तर तुम्ही मारू शकता. जर तुम्ही सुरक्षित क्षेत्राच्या बाहेर असाल तर तुम्ही मिनी-मॅप मधील सफेद रेषेकडे गेले पाहिजे. पण तत्पूर्वी थोडे थांबा आणि विचार करा कारण असे करत असताना तुम्चवर हमला पण होण्याची शक्यता असते. त्यासाठी तुम्ही मिनी-मॅप वर बघा कि सुरक्षित क्षेत्र किती लांब आहे ते जर ते जवळ असल्यास तुम्ही रांगत रंगत पण जाऊ शकता आणि सुरक्षित क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या खेळाडूंना मारू शकता. मिनी-मॅप च्या खाली एक टाइमर असतो ज्यातून तुम्हाला तुमच्याकडे किती वेळ आहे सुरक्षित क्षेत्रात जाण्यासाठी त्याची माहिती मिळते. सुरक्षित क्षेत्र कमी होऊ लागला कि एक छोटा माणूस दिसेल. ते तुम्ही आहात. जेवढे तुम्ही उजवीकडे असाल तेवढे तुम्ही सुरक्षित क्षेत्राच्या जवळ असाल. बार मध्ये भरला जाणारा निळा रंग निळ्या क्षेत्राचे प्रतीक आहे, आणि तुम्हला त्यावरून माहिती मिळेल कि तुम्ही त्याच्या किती जवळ आहात ते.
हवेच्या वेगाने धावा
जर तुम्हला समजले कि सुरक्षित क्षेत्र खूप लांब आहे आणि तुम्हाला आता घाई करावी लगे तर सर्वात आधी एखादे वाहन शोध. अशावेळी कोणतेही वाहन चालेल तुम्हाला. ड्राइविंग करताना तुम्हाला गोळ्या मारल्या जाऊ शकतात पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. सुरक्षित क्षेत्रात जाण्याला प्राधान्य द्या. जर तुमच्यकडे एखादे वाहन नसेल तर धावायला सुरवात करा. धावणे हि क्रिया लॉक करण्यासाठी जॉयस्टिक वर खेचा. वेगाने धावण्यासाठी, संबंधित हत्याराच्या आइकन वर टॅप करू हत्यार लपवा आणि तुमचे डोळे उघडे ठेवा.