भारतात PS4 Slim, PS4 Pro आणि PS VR च्या किंमती झाल्या कमी

Updated on 02-Jan-2019
HIGHLIGHTS

GST Rate Cut नंतर भारतात Sony India च्या अनेक गेमिंग कंसोल्सच्या किंमती कमी झाल्या आहेत. यात PS4 Slim, PS4 Pro आणि PlayStation VR (PS VR) यांचा समावेश आहे. सोबतच या प्रोडक्ट्स संबंधित ऍक्सेसरीजच्य किंमती पण कमी झाल्या आहेत.

महत्वाचे मुद्दे:

  • PS4 Slim 500GB ची किंमत आता 28,580 रुपये झाली आहे
  • PS4 ऍक्सेसरीजच्या किंमती पण झाल्या कमी
  • PS4 Aim Controller आता फक्त 5,050 रुपयांमध्ये

 

Sony India ने नुकतीच रिटेलर्स ना याची माहिती दिली आहे कि भारतीय बाजारात PS4 Slim, PS4 Pro आणि PlayStation VR (PS VR) च्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. आता गेमिंगचे चाहते हे प्रोडक्ट्स सहज विकत घेऊ शकतात. विशेष म्हणजे कमी झालेल्या या किंमतींचे कारण म्हणजे GST कट रेट. GST कौन्सीलने कन्ज्युमर इलेक्ट्रॉनिक्स सोबतच विडिओ गेम कंसोल्स वर पण हा रेट कट लागू केला आहे. 500GB आणि 1TB PS4 Slim व्हर्जन्स वर युजर्सना नवीन MRP मिळाली आहे. त्याचबरोबर Gadgets 360 नुसार अनेक रिटेलर्स आणि सब डिस्ट्रिब्युटर्स कडून समजले आहे कि इतर PS4 संबंधित ऍक्सेसरीज पण कमी किंमतींत मिळत आहेत. यात PS VR, DualShock 4 controller, PS4 Aim Controller, PS4 Platinum Wireless Headset, PS4 Wireless Stereo Headset, PS4 vertical stand सोबत PS4 Twin Pack चा समावेश आहे.

असे आहेत प्रोडक्ट्सच्या MRP मध्ये झालेले बदल

New PS4 Slim, PS4 Pro आणि PS VR प्रोडक्ट्सच्या भारतातील MRP मध्ये बदल झाले आहेत ज्यामुळे त्याची नवीन किंमत समोर आली आहे. PS4 Slim 1TB ची किंमत आधी 36,490 रुपये होती ती आता 33,650 रुपये आहे. PS4 Slim 500GB ची किंमत 30,990 रुपये होती ती आता 28,580 रुपये झाली आहे. PS4 Pro 1TB  41,990 रुपयांच्या ऐवजी आता फक्त 38,710 रुपये MRP सह उपलब्ध आहे. तसेच PS VR (version 2) 30,990 रुपयांच्या ऐवजी आता 28,580 रुपये MRP सह उपलब्ध आहे. PS VR Mega Pack 34,290 रुपयांच्या ऐवजी 31,600 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

भारतीय मार्किट मध्ये New PS4 controllers आणि headsets ची किंमत

DualShock 4 (standard आणि camo variants आता 5,050 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत त्याम्ची याआधी किंमत 5,490 रुपये होती. PS4 Aim Controller 5,490 रुपयांच्या ऐवजी 5,050 रुपए, PS4 Platinum Wireless Headset 14,990 रुपयांच्या ऐवजी 13,810 रुपयांमध्ये, PS4 Wireless Stereo 7,990 रुपयांच्या ऐवजी 7,363 रुपयांमध्ये, PS4 Vertical Stand 1,990 रुपयांच्या ऐवजी आता 1,830 रुपयांमध्ये आणि PS4 Twin Pack 6,990 रुपयांच्या ऐवजी 6,450 रुपयांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. आता या नवीन किंमतीमुळे युजर्स सोबत रिटेलर्स वर याचा काय परिणाम होतो हे बघावे लागेल.

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :