रसिक प्रेक्षकांसाठी ‘Zara Hatke Zara Bachke’ चित्रपट लवकरच OTT वर होणार दाखल, ‘या’ प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

रसिक प्रेक्षकांसाठी ‘Zara Hatke Zara Bachke’ चित्रपट लवकरच OTT वर होणार दाखल, ‘या’ प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज
HIGHLIGHTS

'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार

Zara Hatke Zara Bachke चित्रपट 17 मे रोजी OTT वर रिलीज होणार

या चित्रपटात विकी कौशल आणि सारा अली खानने पहिल्यांदा एकत्र काम केले

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. JioCinema च्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर तसेच इतर सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाच्या OTT रिलीजची घोषणा करण्यात आली. चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा: लोकप्रिय Disney+ Hotstar वर ‘या’ महिन्यात रिलीज होणार भारी चित्रपट आणि सिरीज, बघा यादी

Zara Hatke Zara Bachke OTT रिलीज डेट

JioCinema ने अधिकृत इंस्टाग्राम चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आणि लिहिले, “सहकुटुंब विवाह होता, आता सहकुटुंब घटस्फोटही होणार! तर तुम्हा सर्वांनी #Divorce वर यावे. #ZaraHatkeZaraBachke 17 मे रोजी फक्त Jio Cinema Premium वर स्ट्रीमिंग होत आहे.

ही घोषणा होताच चाहत्यांनी पोस्टवर कमेंट्समध्ये प्रतिक्रिया आणि प्रेमाचा भरभरून वर्षाव केला आहे. ”हा चित्रपट जून 2023 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून 11 महिन्यांनंतर OTT प्लॅटफॉर्मवर प्रवाहित होत आहे.”, असे देखील एका चाहत्याने प्रतिक्रिया दिली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, जरा हटके जरा बचके या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांच्या मॅडॉक स्टुडिओने केली असून दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. या चित्रपटात विकी कौशल आणि सारा अली खानने पहिल्यांदा एकत्र काम केले आहे.

‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाची कथा इंदूरमधील एका जोडप्याच्या आयुष्याभोवती फिरते, जे एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले आहेत. मात्र, लग्नानंतर ते एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहतात, त्यामुळे त्यांना पाहिजे तशी प्रायव्हसी मिळत नाही. प्रायव्हसी मिळवण्यासाठी ते बनावट घटस्फोट घेतात आणि कायदेशीर सरकारी योजनेद्वारे स्वतःसाठी फ्लॅट मिळवण्यासाठी त्यांच्या संघर्ष दाखवण्यात आला आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, अभिनेत्री सारा अली खान याआधी ‘मर्डर मुबारक’ आणि ‘ए वतन मेरे वतन’ मध्ये दिसली होती. अभिनेत्रीने अद्याप त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही. तर विकी कौशल पुढे ‘छावा’ आणि ‘बॅड न्यूज’ चित्रपटात दिसणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo