digit zero1 awards

Upcoming Netflix Series: ‘या’ महिन्यात लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार भारी चित्रपट आणि सिरीज, बघा यादी

Upcoming Netflix Series: ‘या’ महिन्यात लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार भारी चित्रपट आणि सिरीज, बघा यादी
HIGHLIGHTS

'हीरामंडी' ही सिरीज 1 मे 2024 पासून Netflix वर प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे.

अजय देवगण स्टारर 'शैतान' चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल करत आहेत.

हॉरर आणि सस्पेन्स कंटेंटच्या चाहत्यांसाठी Netflix वर एक अप्रतिम भेट आहे.

OTT प्लॅटफॉर्म Netflix वर वेब सिरीज आणि चित्रपट सतत अपडेट केले जातात. रसिक प्रेक्षक आगामी वेब सिरीज आणि त्यावरील चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी या महिन्यात म्हणेजच मे 2024 मध्ये Netflix वर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरीजची संपूर्ण यादी तयार केली आहे. या यादीत हिंदी तसेच इंग्रजी चित्रपट आणि वेब-सिरीज समाविष्ट आहेत. चला तर मग बघुयात आगामी चित्रपट आणि सिरीजची यादी-

Heeramandi

चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांचा ‘हीरामंडी’ ही कहाणी लाहोरच्या हिरामंडीच्या रेड लाईट एरियाच्या मल्लिकाजान आणि त्यांच्या दरबाऱ्यांची कथा आहे. या सिरीजमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख आणि शर्मीन सहगल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही सिरीज 1 मे 2024 पासून Netflix वर प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे.

A Man in Full Season 1

डेव्हिड ई. केली यांनी अटलांटा रिअल इस्टेट मोगलच्या दिवाळखोरीबद्दल टॉम वुल्फच्या कादंबरीवर आधारित सिरीज तयार केली आहे. या सिरीजमध्ये जेफ डॅनियलसह डायन लेन, विल्यम जॅक्सन हार्पर, टॉम पेल्फ्रे आणि लुसी लिऊ यांच्या भूमिका आहेत. ही सिरीज आज 2 मे 2024 पासून Netflix वर उपलब्ध झाली आहे.

Shaitaan

अजय देवगण स्टारर ‘शैतान’ चे दिग्दर्शन विकास बहल करत आहेत. हॉरर आणि सस्पेन्स कंटेंटच्या चाहत्यांसाठी ही एक अप्रतिम भेट आहे. कारण, हा एक हॉरर चित्रपट आहे. ज्यामध्ये अजय देवगणसोबत आर माधवन, ज्योतिका आणि जानकी बोडीवाला यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट 3 मे 2024 रोजी Netflix वर रिलीज होणार आहे.

Unfrosted

जेरी सेनफेल्ड दिग्दर्शित हा चित्रपट 1960 च्या दशकात एक नवीन ब्रेकफास्ट प्रोडक्ट तयार करण्यासाठी केलॉग आणि पोस्ट यांच्यातील स्पर्धेवर केंद्रित आहे. या चित्रपटात सेनफेल्ड, मेलिसा मॅककार्थी, जिम गॅफिगन, जेम्स मार्सडेन, ख्रिश्चन स्लेटर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट देखील 3 मे 2024 रोजी Netflix वर रिलीज होणार आहे.

The Atypical Family

‘द ॲटिपिकल फॅमिली’ एक कोरियन ड्रामा आहे. ही फॅमिली अलौकिक (सुपरनॅचरल) शक्तींनी सुसज्ज अशा कुटुंबाभोवती फिरते, जे काही समस्यांमुळे आपली क्षमता गमावतात. जेव्हा एक रहस्यमय स्त्री त्यांच्या आयुष्यात प्रवेश करते आणि सर्व काही बदलते तेव्हा त्यांच्यासाठी प्रकाशाचा किरण उदयास येतो. हा शो 4 मे 2024 रोजी Netflix वर रिलीज होणार आहे.

Bridgerton Season 3

ब्रिजरटनचा तिसरा सीझन 16 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. सीझन 3 हा मित्र आणि प्रियकर यांच्यातील नाते एक्सप्लोर करेल. ब्रिजरटन ज्युलिया क्विनच्या ऐतिहासिक प्रणय कादंबरीवर आधारित आहे. या सिरीजमध्ये पेनेलोप फेदरिंग्टन (निकोला कफलन) आणि कॉलिन ब्रिजरटन (ल्यूक न्यूटन) मुख्य भूमिकेत आहेत.

Eric Season 1

‘एरिक’ या महिन्यात Netflix ने ऑफर केलेल्या सर्वोत्तम सिरीजपैकी एक असू शकते. 80 च्या दशकातील न्यू यॉर्क सिटीमध्ये सेट केलेल्या या मिस्ट्री सिरीजमध्ये बेनेडिक्ट कंबरबॅच एका लोकप्रिय मुलांच्या शोमध्ये कठपुतळीची भूमिका करत आहे. ही सिरीज या महिन्याच्या शेवटी 30 मे 2024 ला रिलीज होणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo