Paatal Lok Season 2: नव्या सिझनच्या ट्रेलरने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, पहा जबरदस्त Video 

Paatal Lok Season 2: नव्या सिझनच्या ट्रेलरने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, पहा जबरदस्त Video 
HIGHLIGHTS

मोस्ट अवेटेड वेब सिरीज 'पाताल लोक 2' चा टीझर रिलीज झाला आहे.

प्रेक्षक 17 जानेवारी 2025 पासून Amazon प्राइम व्हिडिओवर त्याचा दुसरा सीझन पाहू शकतील.

नवा 'पाताल लोक सीझन 2' चा ट्रेलर थ्रिलने भरलेला आहे.

Paatal Lok Season 2: लोकप्रिय ‘पाताल लोक’ वेब सिरीजच्या घवघवीत यशानंतर या सिरीजचा दुसरा प्रेक्षकांची मन जिंकण्यास सज्ज झाला आहे. होय, जयदीप अहलावतच्या मोस्ट अवेटेड वेब सिरीज ‘पाताल लोक 2’ चा टीझर रिलीज झाला आहे. आज सोमवार 6 जानेवारी रोजी एक दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या सिरीजचे दिग्दर्शन अविनाश अरुण यांनी केले आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता, हाती राम चौधरी सोबत डार्क आणि आव्हानांच्या नवीन जगात प्रवेश करण्यासाठी सज्ज व्हा. पाहुयात ट्रेलर-

Also Read: Samsung Galaxy S25 Ultra: अपेक्षित लाँच तारीख, भारतीय किंमत आणि इतर सर्व तपशील, वाचा सविस्तर

Paatal Lok Season 2 Trailer

नवा ‘पाताल लोक सीझन 2’ चा ट्रेलर थ्रिलने भरलेला आहे. हा ट्रेलर क्राइम थ्रिलरची झलक देतो. या व्हीडिओमध्ये इन्स्पेक्टर हाथीराम चौधरी न पाहिलेल्या आणि नवीन आव्हानांशी झुंज देताना दिसत आहेत. नागालँडमधील एका बड्या व्यक्तीच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे, ज्याचे प्रकरण दिल्ली पोलिसांकडे आले आहे. त्याचा विश्वासू साथीदार इम्रान अन्सारी याच्यासोबत तो सत्याच्या शोधात आपला संघर्ष सुरू ठेवतो.

सिरीजमधील पात्रांबद्दल बोलायचे झाल्यास, जयदीप व्यतिरिक्त इश्वाक सिंग आणि गुल पनाग नव्या सत्रात पुनरागमन करत आहेत. तसेच तिलोत्तमा शोम, नागेश कुकुनूर आणि जाह्नू या नवीन कलाकारांचाही मुख्य पात्रांमध्ये प्रवेश आहे. संपूर्ण 5 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, प्रेक्षक 17 जानेवारी 2025 पासून Amazon Prime Video वर त्याचा दुसरा सीझन पाहू शकतील.

ट्रेलर पाहून असे समजते की, यावेळी निर्मात्यांनी कथा अधिक रोमांचक करण्यासाठी नागालँड राज्याची निवड केली आहे. यावेळी तिलोत्तमा शोम देखील अंडरवर्ल्डचा एक भाग बनली आहे. ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान कलाकारांपैकी एक मानली जाते.

Paatal Lok Season 2 release date

Paatal Lok Season 1

कर्णेश शर्माच्या प्रोडक्शन हाऊस क्लीन स्लेट फिल्म्सद्वारे निर्मित ‘पाताल लोक’ चे दोन्ही सीझन या अंतर्गत तयार करण्यात आले आहेत. पहिल्या सिझनवर एक जर टाकताना आम्ही तुम्हाला सांगतो की, ‘पाताल लोक’चा सीझन 1 2020 मध्ये रिलीज झालं होता, या सिझनने दिउघकाळपर्यंत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आम्ही तुम्हाला सांगतो की, कोरोना लॉकडाऊन दरम्यान या शोला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo