digit zero1 awards

OTT Release This Week: ‘या’ आठवड्यात मिळेल मनोरंजनाचा डबल डोस, क्राईमसह मिळेल कॉमेडीचा तडका

OTT Release This Week: ‘या’ आठवड्यात मिळेल मनोरंजनाचा डबल डोस, क्राईमसह मिळेल कॉमेडीचा तडका
HIGHLIGHTS

'मडगाव एक्स्प्रेस' Disney+Hotstar वर रिलीज करण्यात आली आहे.

'बस्तर द नक्सल स्टोरी' चित्रपट नक्षलवादी-माओवादी बंडखोरीवर आधारित

बाहुबली क्राउन ऑफ ब्लड लहान मुलं आणि बाहुबलीच्या चाहत्यांसाठी मनोरंजक

दर आठवड्याला OTT वर अनेक नवनवीन चित्रपट आणि वेब सिरीज रिलीज होत असतात. सिनेरसिक आणि प्रेक्षकांचा OTT वरील कंटेंटला भरभरून प्रतिसाद मिळतो. कारण, प्रेक्षकांना आता थिएटरपेक्षा जास्त चित्रपट आणि वेब सीरिज घरबसल्या पाहायला आवडतात. दरम्यान, मे महिन्याचा तिसरा आठवडाही प्रेक्षकांसाठी खूप मनोरंजक असणार आहे. या आठवड्यातही अनेक धमाकेदार चित्रपट OTT वर प्रदर्शित झाले/होणार आहेत. OTT प्लॅटफॉर्मवर या विकेंडला पुढीलप्रमाणे नवे चित्रपट आणि वेब सीरिज बघा. 

बाहुबली क्राउन ऑफ ब्लड

एसएस राजामौली यांची सिरीज ‘बाहुबली क्राउन ऑफ ब्लड’ ही बाहुबली चित्रपटाच्या घटनांपूर्वी घडलेली कहाणी दर्शविते. कथेत बाहुबली आणि भल्लालदेव यांच्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. कारण ते महिष्मतीच्या संरक्षणासाठी एकत्र लढतात. ही ॲनिमेटेड सिरीज Disney+Hotstar वर 17 मे रोजी रिलीज झाली आहे. लहान मुलं तसेच बाहुबलीच्या चाहत्यांसाठी ही एक मनोरंजक सिरीज आहे.  

बस्तर द नक्सल स्टोरी

‘बस्तर द नक्सल स्टोरी’ चित्रपट अर्थातच छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील नक्षलवादी-माओवादी बंडखोरीवर आधारित आहे. या चित्रपटात अदा शर्मा, इंदिरा तिवारी, विजय कृष्णा, शिल्पा शुक्ला, यशपाल शर्मा, सुब्रत दत्ता आणि रायमा सेन कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट ZEE5 वर आज म्हणजेच 17 मे रोजी प्रदर्शित झाला  आहे.

मडगाव एक्सप्रेस

‘मडगाव एक्स्प्रेस’ मध्ये तीन बालपणीचे मित्र प्रतीक गांधी, दिव्येंदू आणि अविनाश तिवारी यांचा प्रवास आहे. हे तिन्ही मित्र गोव्याच्या प्रवासाला निघाले. त्यांचा प्रवास पूर्णपणे रुळावरून घसरतो. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री नोरा देखील आहे. माफियाच्या तावडीत सापडल्यावर तिन्ही मित्रांचा प्रवास अडचणीत बदलतो. चित्रपट Disney+Hotstar वर 17 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. 

जरा हटके जरा बचके

विकी कौशल आणि सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके‘ हा चित्रपट रिलीजच्या एका वर्षानंतर OTT पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. हा रोमँटिक कॉमेडी ड्रामा चित्रपटही सरकारी योजनांचा पर्दाफाश करणारा आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट 17 मे रोजी JioCinema वर दाखल होणार आहे.

स्वातंत्र्य वीर सावरकर

स्वातंत्र्य वीर सावरकरांची कथा लेखक आणि राजकारणी विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांना ‘वीर सावरकर’ म्हणूनही ओळखले जाते. रणदीप हुड्डा यांनी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 17 मे रोजी ZEE5 वर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.

गॉडझिला X काँग द न्यू एम्पायर

‘गॉडझिला X काँग द न्यू एम्पायर’ गॉडझिला आणि सर्वशक्तिमान काँगभोवती फिरते. कारण त्यांना अशा धोक्याचा सामना करावा लागतो, जो मानव जातीच्या अस्तित्वाला आव्हान देऊ शकतो. ॲडम विंगर्ड दिग्दर्शित या चित्रपटात रेबेका हॉल, ब्रायन टायरी हेन्री, डॅन स्टीव्हन्स, कायले हॉटल, ॲलेक्स फर्न्स आणि फाला चेन हे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 13 मे 2024 रोजी BookMyShow वर रिलीज झाला.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo