New Year’s Eve movies: नववर्षाची आनंदी सुरुवात करा तुमच्या कुटुंबासह! OTT वर पहा ‘5’ जबरदस्त बॉलीवूड चित्रपट

Updated on 31-Dec-2024
HIGHLIGHTS

आज 31 डिसेंबर 2024 या वर्षाचा शेवटचा दिवस आहे.

न्यू इयर्स इव्हला OTT वर उपलब्ध पुढील 5 बॉलीवूड चित्रपटांचा आनंद तुमच्या कुटुंबासह घेऊ शकता.

या यादीत तुम्हाला बॉलीवूडचे टॉप कॉमेडी, प्रेरणादायी, विनोदी प्रेमकथा इ. शैलींचे चित्रपट मिळतील.

New Year’s Eve movies: आज 31 डिसेंबर 2024 या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. नव्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करत असताना कुटुंबासह असणे आवश्यक आहे. दरम्यान, लक्षात घ्या की, तुमच्या प्रियजनांसोबत बॉलीवूड चित्रपट पाहून आनंदाचे क्षण साजरे करणे, यापेक्षा दुसरा कोणताही उत्तम मार्ग नाही. जर तुम्ही घरीच ‘न्यू इयर्स इव्ह’ चा साजरी करत असाल तर, OTT वर उपलब्ध पुढील 5 बॉलीवूड चित्रपटांचा आनंद तुमच्या कुटुंबासह घेऊ शकता. पहा यादी-

Also Read: Squid Game Season 3: Netflix प्रसिद्ध कोरियन ड्रामाचा तिसरा भाग कधी पाहता येईल? वाचा डिटेल्स

Hera Pheri- Amazon Prime Video

बॉलीवूडचा सर्वात लोकप्रिय चित्रपट ‘हेरा फेरी’ आणि त्याचा दुसरा भाग ‘फिर हेरा फेरी’ आनंदाचे क्षण साजरा करण्यासाठी सर्वोत्तम चित्रपटांपैकी आहेत. कुटुंबासोबत हे चित्रपट पाहण्याची मज्जा काही औरचं असते. केवळ मनोरंजनाच्या शोधात असलेल्यांसाठी, अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल अभिनीत हा कॉमेडी नॉनस्टॉप हास्य प्रदान करतो. बाबुराव गणपतराव आपटे, राजू, शाम, इ. चित्रपटातील संस्मरणीय पात्रे तुम्ही न्यू इयर्स इव्ह अगदी हास्याने परिपूर्ण करतील, याची आम्ही तुम्हाला खात्री देतो.

Jab We Met- JioCinema

‘जब वी मेट’ हा चित्रपट बॉलीवूडचा लाडका चित्रपट आहे. यात अभिनेत्री करीना कपूरच्या उत्साही ‘भटिंडा की सिखनी’ आणि अभिनेता शाहीद कपूरच्या शांत आणि संगीतप्रिय आदित्य कश्यपच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर भरपूर राज्य केले. हा चित्रपट एकूणच प्रेक्षकांमध्ये सकारात्मक ऊर्जा जागृत करतो. रतलाम, कोटा, भटिंडा, मनाली आणि शिमला या मार्गाने अपारंपरिक प्रवासात फुललेल्या प्रेमाच्या अस्सल चित्रणात चित्रपटाचे आकर्षण आहे. हा चित्रपट नेहमीसाठी लोकप्रिय झाला आहे.

Zindagi Na Milegi Dobara- Netflix

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा बॉलीवूडचा सुप्रसिद्ध चित्रपट आहे. हा चित्रपट स्पेनमधून एका परिवर्तनीय रोड ट्रिपवर तीन मित्रांना फॉलो करतो. केवळ एका प्रवासाच्या कथेपेक्षा, चित्रपट मैत्री, प्रेम आणि जीवनातील अनेक अमुल्य संधींचा स्वीकार करण्याबद्दल सखोल धडे देतो. साहस आणि भावना यांचे परिपूर्ण मिश्रण असेलला हा चित्रपट नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी एक प्रेरणादायी निवड आहे.

Hasee Toh Phasee- Netflix

या अपारंपरिक प्रेमकथेची सिद्धार्थ मल्होत्राच्या लाडक्या निखिलसोबत भावनिकदृष्ट्या गुंतागुंतीची मीता म्हणून परिणिती चोप्राची जोडी आहे. या चित्रपटात त्यांची केमिस्ट्री गोड आणि निरागस पद्धतीने उलगडते. ही एक अनोखी रोमँटिक कथा आहे, जी दर्शकांना विशिष्ट रोमँटिक सूत्रांच्या पलीकडे नेते. जर तुम्ही एक रोमॅंटिक स्टोरी शोधत असाल, तर हा एक बेस्ट चित्रपट ठरेल.

Piku- SonyLIV

पिकू हा बॉलीवूफ चित्रपट काही वर्षांपूर्वी रिलीज झाला. ही हृदयस्पर्शी कथेत प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या वास्तुविशारद आणि तिचे विलक्षण वडील यांच्यातील अनोखे नाते दिसते. सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन आणि इरफान खान या कॉमेडी-ड्रामामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. हे कलाकार चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करत असताना कौटुंबिक बंध साजरे करतात. कुटुंबासोबत नववर्षाचे स्वागत तुम्ही या खास जोडीसह करू शकता.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :