digit zero1 awards

OTT Releases This Week: या आठवड्यात मिस्ट्रीसह मिळेल कॉमेडीचा डोस, जबरदस्त चित्रपट आणि सिरीज होणार रिलीज

OTT Releases This Week: या आठवड्यात मिस्ट्रीसह मिळेल कॉमेडीचा डोस, जबरदस्त चित्रपट आणि सिरीज होणार रिलीज
HIGHLIGHTS

Aquaman And The Lost Kingdom या आठवड्यात OTT प्लॅटफॉर्म JioCinema वर रिलीज होणार

Pauline हा एक रहस्यमय काल्पनिक (मिस्ट्री फँटसी) चित्रपट आहे.

Crew चित्रपटात बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर, तब्बू, क्रिती सेनन यांच्या प्रमुख भूमिका

दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यात देखील OTT प्लॅटफॉर्मवर नवे शोज प्रेक्षकांसाठी रिलीज होणार आहे. नवीन आठवडा सुरु झाल्यास, प्रेक्षक नव्याने रिलीज होणाऱ्या वेब सिरीज आणि चित्रपटांची आतुरतेने वाट पाहतात. या आठवड्यात Aquaman And The Lost Kingdom, Toughest Forces On Earth, Pauline, Jurassic World: Chaos Theory, Crew, स्वातंत्र्य वीर सावरकर इ. चित्रपट आणि वेब सिरीज OTT वर रिलीज होत आहेत. बघुयात यादी-

हे सुद्धा वाचा: Netflix ने दिला युजर्सना मोठा धक्का! पुढील महिन्यापासून Important फिचर होणार बंद, वाचा डिटेल्स

Aquaman And The Lost Kingdom

Aquaman And The Lost Kingdom या आठवड्यात OTT प्लॅटफॉर्म JioCinema वर रिलीज होणार आहे. यात जेसन मोमोआ, पॅट्रिक विल्सन, याह्या अब्दुल-मतीन II, अंबर हर्ड आणि निकोल किडमन या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. ही एक कृती कल्पनारम्य आहे, ज्यामध्ये एक्वामन त्याच्या राज्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतो. सिरीज 22 मे रोजी OTT वर रिलीज झाली आहे.

Toughest Forces On Earth

Toughest Forces On Earth ही एक डॉक्युमेंट्री सिरीज आहे. जी यू.एस. आर्मी रेंजर, ब्रिटीश स्पेशल फोर्स ऑपरेटर आणि यू.एस. नेव्ही सील यांच्या ऑपरेशन्सचे अनुसरण करते. या सिरीजमध्ये Ryan Bates, Dean Stott, Cameron Fath यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही सिरीज 22 मे रोजी Netflix वर रिलीज झाली आहे.

Pauline

Pauline हा एक रहस्यमय काल्पनिक (मिस्ट्री फँटसी) चित्रपट आहे. चित्रपट सेबॅस्टिन कॉली, मॅथियास मर्मन आणि फिलिप कासबोहरर यांनी दिग्दर्शित केले आहे. पॉलीन ही 18 वर्षांच्या मुलीची कथा आहे जिला गरोदर झाल्यानंतर अलौकिक शक्ती प्राप्त होते. चित्रपटात Luger Bockelman, Niketa Thompson, Sira-Anna Fall इ. कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 22 मे रोजी Disney+Hotstar वर रिलीज झाला आहे.

Crew

Crew या कॉमेडी चित्रपटात बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर, तब्बू, क्रिती सेनन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा तीन एअर अटेंडंट्सची आहे, ज्यांनी एअरलाइनच्या दिवाळखोरीबद्दल गोंधळ निर्माण केला. चित्रपट 24 मे रोजी Netflix वर रिलीज होणार आहे.

Jurassic World: Chaos Theory

Jurassic World: Chaos Theory सिरीज डॅरियस बोमन या तरुण जीवाश्मशास्त्रज्ञाचे अनुसरण करते. ज्याने कॅलिफोर्नियाच्या जंगलात मुक्तपणे फिरणाऱ्या डायनासोर आणि मानवांबद्दल जागतिक धोक्याची रहस्ये उलगडली. चित्रपट 24 मे रोजी Netflix वर रिलीज होणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo