Squid Game Season 3: Netflix प्रसिद्ध कोरियन ड्रामाचा तिसरा भाग कधी पाहता येईल? वाचा डिटेल्स
Squid Game सीझन 2 च्या ट्विस्ट आणि टर्न्सना कोरियन लव्हर्स आतुरतेने फॉलो करत आहेत.
सिरीजचे निर्माता Hwang Dong-hyuk ने पुढील सिझनबाबत काही तपशील शेअर केले.
सीझन 3 हा स्क्विड गेम सिरीजचा शेवटचा सिझन असणार आहे.
Squid Game Season 3: अलीकडेच Netflix वर रिलीज झालेल्या Squid Game सीझन 2 च्या ट्विस्ट आणि टर्न्सना कोरियन लव्हर्स आतुरतेने फॉलो करत आहेत. त्यामुळे आगामी तिसऱ्या आणि शेवटच्या सीझनसाठी आधीच उत्साह निर्माण होत आहे. दरम्यान, Netflix ने पुष्टी केली आहे की, या जागतिक स्तरावर लोकप्रिय K-ड्रामा सिरीजमधील पुढील अध्याय प्रीमियरसाठी सेट आहे. तर, सिरीजचे निर्माता Hwang Dong-hyuk ने याबाबत चाहत्यांसाठी काही तपशील शेअर केले आहेत. जाणून घेऊयात सविस्तर-
स्क्विड गेम सीझन 3 प्रीमियर कधी होईल?
आम्ही तुम्हाला सांगतो की, स्क्विड गेम सीझन 3 च्या प्रीमियरची अचूक तारीख उघड झालेली नाही. मात्र, निर्माता Hwang Dong-hyuk ने याबाबतचा अंदाज दर्शवला आहे. त्याने सांगितले की, चाहते 2025 च्या उन्हाळ्यात किंवा जवळपास तिसरा सीझन प्रीमियर होण्याची अपेक्षा करू शकतात. त्यामुळे या प्राणघातक गेममध्ये पुढे काय होते, हे जाणून घेण्यासाठी दर्शकांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Time to open your presents 🎁
— Netflix India (@NetflixIndia) December 26, 2024
Watch Squid Game 2 now, only on Netflix.#SquidGame2 pic.twitter.com/jazdORjSib
मात्र, हे स्पष्ट आहे की, स्क्विड गेम सीझन 3 टेबलवर अनेक नव्या ट्विस्टसह येईल. शो त्याच्या मध्यवर्ती पात्रांच्या, विशेषत: गि-हुन यांच्या मानसिक आणि भावनिक संघर्षांचा शोध घेत राहील. आम्ही तुम्हाला सांगतो की, Lee Jung-jae, Lee Byung-hun, Wi Ha-jun, Yim Si-wan, Kang Ha-neul इ. कलाकार या सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, स्क्विड गेम सीझन 3 आधीच चित्रित केला गेला आहे आणि 2025 मध्ये रिलीज होणार आहे. सीझन 3 हा स्क्विड गेम सिरीजचा शेवटचा सिझन असणार आहे. हा सिझन एक रोमांचक आणि तीव्र निष्कर्ष देण्याचे नक्कीच वचन देतो. लक्षात घ्या, सिरीजचे सीझन 1 आणि 1 सध्या लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile