‘Mufasa: The Lion King’ OTT Release: शाहरुख, आर्यन आणि अबरामचा चित्रपट कधी आणि कुठे होणार OTT वर रिलीज? 

‘Mufasa: The Lion King’ OTT Release: शाहरुख, आर्यन आणि अबरामचा चित्रपट कधी आणि कुठे होणार OTT वर रिलीज? 
HIGHLIGHTS

20 डिसेंबर रोजी प्रसिद्ध ऍनिमेटेड चित्रपट 'Mufasa: The Lion King' चित्रपटगृहात रिलीज झाला.

सुपरस्टार शाहरुख खान, त्याची मुले आर्यन आणि अबरामने या पितापुत्रांनी चित्रपटासाठी आवाज दिला.

जाणून घ्या या ॲनिमेटेड चित्रपटाच्या OTT रिलीजच्या तपशील

‘Mufasa: The Lion King’ OTT Release: नुकतेच 20 डिसेंबर रोजी प्रसिद्ध ऍनिमेटेड चित्रपट ‘Mufasa: The Lion King’ चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. चित्रपटाचा पहिला भाग म्हणजेच ‘द लायन किंग’ ने भरभरून यश मिळविल्यानंतर, चित्रपटाचा दुसरा भाग मुफासा: द लायन किंग’ देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत सर्वात जास्त कमाई केली असल्याचे वृत्त समोर आले आहे.

बॉलीवूडचे प्रसिद्ध सुपरस्टार शाहरुख खान, त्याची मुले आर्यन आणि अबराम या पितापुत्रांनी चित्रपटाच्या हिंदी भागासाठी आवाज दिला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, चित्रपटगृहात मिळत असलेल्या भरभरून यशानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

Also Read: Heeramandi 2: 2024 मधील सर्वात ट्रेंडिंग वेब सिरीजच्या दुसऱ्या सिझनबद्दल मोठा खुलासा, अभिनेत्रीने दिली माहिती

‘Mufasa: The Lion King’ OTT Release

सध्या मुफासा: द लायन किंग चित्रपट फक्त थिएटरमध्ये उपलब्ध आहे. शुक्रवारी 20 डिसेंबर 2024 रोजी हा चित्रपट अधिकृतपणे मोठ्या पडद्यावर रिलीज झाला आहे. या ॲनिमेटेड चित्रपटाच्या OTT रिलीजच्या तपशीलावर चर्चा करणे खूप लवकर असले तरी, तुम्ही ‘मुफासा: द लायन किंग’ ऑनलाइन मिळवू शकता. मिळालेल्या माहितीनुसार, हा Disney निर्मित चित्रपट असल्यामुळे हे स्पष्ट होते की, ‘मुफासा: द लायन किंग’ Disney+ Hotstar वर प्रसारित होईल, अशी शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे. थिएटर रिलीजच्या दोन महिन्यांनंतर चित्रपट OTT वर येतो.

त्यामुळे, हा चित्रपट Netflix आणि Amazon Prime Video वर स्ट्रीम होण्याची शक्यता कमी आहे. मुफासा: द लायन किंग ही मुफासाच्या उत्पत्तीची आणि त्याच्या ‘लायन किंग’ बनण्याची कथा आहे. तो एक दयाळू आणि सहानुभूतीशील सिंहाच्या पिल्लाला कसा भेटतो आणि त्याच्या राजघराण्याने त्याला दत्तक घेतले, हे देखील या कथेत दाखवले आहे.

‘Mufasa: The Lion King’ कास्ट

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, मुफासा: द लायन किंग, ऑस्कर-विजेता मूनलाइट चित्रपट निर्माते बॅरी जेनकिन्स, द लायन किंगच्या 2019 च्या ‘लाइव्ह ॲक्शन’ रिमेकचा प्रीक्वल आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना त्या काळात घेऊन जातो, जेव्हा मुफासा आणि टाका हे स्कार म्हणून ओळखले जात होते. नवा चित्रपट ॲनिमेशन, पॅकेजिंग आणि वेगवेगळ्या भाषांमधील व्हॉइस कास्टसाठी आधीच चर्चेत आहे.

होय, बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने मुले आर्यन आणि अबराम यांच्यासह हिंदी डबसाठी आपला आवाज दिला आहे. एवढेच नाही तर, त्याच्यासोबत संजय मिश्रा, श्रेयस तळपदे, मीयांग चांग आणि मकरंद देशपांडे असे प्रसिद्ध कलाकार देखील यात सामील झाले आहेत. तर, तेलगू भाषेतील डबिंगसाठी साऊथचे सुपरस्टार महेश बाबू ने आवाज दिला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo