Heeramandi 2: 2024 मधील सर्वात ट्रेंडिंग वेब सिरीजच्या दुसऱ्या सिझनबद्दल मोठा खुलासा, अभिनेत्रीने दिली माहिती 

Heeramandi 2: 2024 मधील सर्वात ट्रेंडिंग वेब सिरीजच्या दुसऱ्या सिझनबद्दल मोठा खुलासा, अभिनेत्रीने दिली माहिती 
HIGHLIGHTS

हीरामंडी: द डायमंड बझार' या वेबसिरीजच्या पहिल्या सीझनने या वर्षी चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले.

हिरामंडी फेम अभिनेत्री संजीदा शेखने सिरीजच्या दुसऱ्या सिझनबद्दल दिले महत्त्वाचे अपडेट

हीरामंडी वेब सिरीज 2024 मध्ये गुगल ट्रेंडवर सर्वाधिक शोधले गेलेले शो आहे.

Heeramandi 2: बॉलीवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि संगीतकार संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी: द डायमंड बझार’ या वेबसिरीजच्या पहिल्या सीझनने या वर्षी चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. या सिरीजमधील दृश्ये तसेच कलाकारांनी आपल्या निरनिराळ्या कलेने प्रेक्षकांच्या मनावर मोठ्या प्रमाणात राज्य केले आहे. दरम्यान, असे वृत्त आहे की, या सुप्रसिद्ध सिरीजचा दुसरा सीझनही लवकरच येणार आहे. सिनेरसिक मोठ्या आतुरतेने हिरामंडीच्या दुसऱ्या सिझनची प्रतीक्षा करत आहेत.

आम्ही तुम्हाला सांगतो की, आता या सिरीजमध्ये वहिदाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री संजीदा शेखने दुसऱ्या सीझनचे एक मोठे अपडेट शेअर केले आहे. अभिनेत्रीने हिरामंडीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.

Also Read: Best OTT Series 2024: Heeramandi ते Panchayat! ‘या’ वर्षी Google वर सर्वाधिक सर्च केलेले शोज, पहा टॉप 5 शो

Heeramandi 2 OTT release

Heeramandi 2

मिळालेल्या वृत्तानुसार, हिरामंडी फेम अभिनेत्री संजीदा शेख यांनी संजय लीला भन्साळीच्या ‘हीरामंडी 2’ बद्दल महत्त्वाचे अपडेट दिले आहे. आभिनत्री संजीदा म्हणाली की, हीरामंडीचा आगामी म्हणजेच दुसरा सीझन ‘मोठा आणि आणखी चांगला’ असेल. पुढे संजीदाने सांगितले की, या शूटिंगची टाइमलाइन अद्याप ठरलेली नाही. मात्र, सर्व कलाकार सिरीजच्या दुसऱ्या भागासाठी सज्ज आहेत.

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हीरामंडी वेब सिरीज 2024 मध्ये गुगल ट्रेंडवर सर्वाधिक शोधले गेलेले शो आणि चित्रपटांपैकी एक बनले आहे. हिरामंडी सीझन 1 मध्ये बॉलीवूड प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, शर्मीन सहगल या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. तर, बॉलीवूड प्रसिद्ध अभिनेते शेखर सुमन, फरदीन खान, ताहा शाह अनेक कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

ही सिरीज स्वातंत्र्यपूर्व काळातील वेश्यांच्या जीवनावर आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानावर केंद्रित आहे. अभिनेत्री पुढे म्हणाली की, “कलाकारांना त्यांच्या अभिनय, व्यक्तिरेखा आणि शोसाठी ओळख हवी असते आणि सर्वाधिक शोधल्या गेलेल्या शोचा भाग बनणे खरोखरच आनंददायी आहे.” ही सिरीज सध्या लोकप्रिय OTT प्लेटफॉर्म Netflix वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo