OTT प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar वर दर्शकांसाठी भरपूर कंटेंट उपलब्ध आहे. भारतीय ग्राहकांमध्ये Disney+Hotstar OTT प्लॅटफॉर्म अगदी लोकप्रिय आहे. या प्लॅटफॉर्मवर केवळ भारतीय भाषांमध्येच नाहीत, तर तुम्ही हॉलिवूडमधील सर्वोत्तम चित्रपट, सिरीज, ॲनिमेशन मुव्हीज देखील बघू शकता. या महिन्यात Hotstar वर Star Wars: Tales of The Empire, Manjummel Boys, Monsters at Work season 2, Doctor Who, Jim Henson: Idea Man चित्रपट-सिरीज प्रदर्शित होत आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात यादी-
‘स्टार वॉर्स: टेल्स ऑफ द एम्पायर’ या महिन्यात Disney+ Hotstar वर प्रदर्शित झाली आहे. ही एक ऍनिमेटेड सिरीज आहे. या ॲनिमेटेड मिनी सीरिजचे 6 भाग आहेत. या सिरीजमध्ये दोन योद्ध्यांची कथा आहे. तो Disney+Hotstar वर 4 मे रोजी प्रदर्शित झाली आहे.
Disney Plus Hotstar ची ॲनिमेटेड सिरीज Monsters at Work या आठवड्यात नवीन एपिसोड्ससह परत आली आहे. या सिरीजचा मागील सीझन जिथून संपला तेथूनच नव्या सिझनची सुरुवात झाली आहे. नवे सिझन टायलर टस्कमॉनच्या जीवनाचे अनुसरण करते, जो मजेदार बनण्याच्या आणि विदूषक बनण्याच्या युक्त्या शिकतो. ही सिरीज 5 मे पासून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे.
या महिन्यात Disney+Hotstar वर प्रेक्षकांच्या भेटीला ‘Doctor Who’ येणार आहेत. यात Nkuti Gatwa, Millie Gibson आणि David Tennant यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा एक सायन्स-फिक्शन ड्रामा आहे. यामध्ये टाइम लॉर्ड, ज्याला डॉक्टर म्हणून ओळखले जाते. त्याच्या साथीदारांसह धोकादायक शत्रूंचा सामना करून आणि अविश्वसनीय साहसांसह अवकाश आणि काळामधून प्रवास करतो. ही सिरीज 10 मे पासून स्ट्रीम होणार आहे.
Jim Henson: Idea Man हा एक माहितीपट म्हणजेच डॉक्युमेंट्री आहे. ज्यामध्ये जिम हेन्सनच्या कामाच्या चाहत्यांच्या मुलाखती आहेत. याव्यतिरिक्त, त्यात जिम हेन्सनच्या कामाचे फुटेज देखील दाखवण्यात येणार आहे. ही डॉक्यूमेंट्री चाहत्यांना या महिन्याच्या शेवटी बघायला मिळेल. होय, ही डॉक्युमेंट्री 31 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.