Best Series On OTT: सत्य घटनेवर आधारित आहेत ‘या’ जबरदस्त भारतीय सिरीज, तुम्ही पाहिले का?
सत्य घटनेवर आधारित जबरदस्त वेब सिरीज OTT वर उपलब्ध
'दिल्ली क्राइम्स' या वेब सीरिजमध्ये निर्भया बलात्कार प्रकरण दाखवण्यात आले आहे.
प्रसिद्ध 'स्कूप' ही वेबसिरीज प्रसिद्ध जेष्ठ, महिला क्राईम रिपोर्टरच्या जीवनावर आधारित आहे.
Best Series On OTT: सध्या OTT सिरीजचे ट्रेंड सिनेरसिकांमध्ये वाढतच चालेल आहे. मेकर्स अनेक जबरदस्त कथानक दर्शवण्यात निपुण झाले आहेत. आपण सर्वांना माहितीच आहे की, चित्रपट असो किंवा वेब सिरीज अशा अनेक कथा पाहायला मिळतात ज्या सत्य घटनांपासून प्रेरित असतात. या कथा पाहिल्यावर हे खरेच घडले असावे यावर विश्वास बसणे देखील कठीण असते.
Also Read: Paatal Lok Season 2: नव्या सिझनच्या ट्रेलरने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, पहा जबरदस्त Video
नुकतीच रिलीज झालेली वेब सिरीज ‘स्क्विड गेम’ देखील एका खऱ्या कथेपासून प्रेरित असल्याचे, बोलले जाते. याशिवाय अनेक भारतीय वेब सिरीज आहेत, ज्या सत्य घटनांपासून प्रेरित आहेत. पहा यादी-
दिल्ली क्राइम्स 2
‘दिल्ली क्राइम्स’ या वेब सीरिजमध्ये निर्भया बलात्कार प्रकरण दाखवण्यात आले आहे. एवढेच नाही तर, ‘दिल्ली क्राईम्स 2’ मध्ये राजधानी दिल्लीत घडणारे अनेक गुन्हे दाखवण्यात आले आहेत. या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री शेफाली शाह एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. वेब सीरिजची कथा ती दिल्लीत घडणाऱ्या गुन्ह्यांची उकल कशी करते यावर आधारित आहे. ही सिरीज तुम्ही Netflix वर पाहायला मिळणार आहे.
स्कॅम 1992
रिलीज होताच अत्यंत लोकप्रिय झालेल्या वेब सिरीज ‘स्कॅम 1992’ ही खऱ्या घोटाळ्यावर आधारित सिरीज आहे. कथानकाबद्दल बोलायचे झाल्यास, शेअर बाजारातील हा घोटाळा होता, ज्यामध्ये स्टॉक ब्रोकर हर्षता मेहता यांचा सहभाग होता. वेब सिरीजमध्ये हर्षद मेहता आणि त्याच्या घोटाळ्याची कथा दाखवण्यात आली होती. लक्षात घ्या की, प्रतिक गांधी या वेबसिरीजमध्ये हर्षद मेहताची भूमिका साकारत आहे. ही सिरीज Sony LIV या प्लॅटफॉर्मवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
स्कूप
प्रसिद्ध ‘स्कूप’ ही वेबसिरीज प्रसिद्ध जेष्ठ आणि महिला पत्रकार ‘जिग्ना व्होरा’ यांच्या जीवनावर आधारित आहे. एका पत्रकाराच्या हत्येप्रकरणी तुरुंगात जाणारी ती क्राईम रिपोर्टर होती. एका पत्रकाराच्या धक्कादायक हत्येमुळे एका आघाडीच्या गुन्हेगारी पत्रकाराला न्यायासाठी लढताना पोलिस, मीडिया आणि मुंबईतील अंडरवर्ल्डच्या साखळीत ढकलले जाते. या सिरीजमध्ये अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने जिग्नाची भूमिका साकारली आहे. ही सिरीज देखील Netflix वर पाहायला मिळेल.
जामतारा
जवळपास दोन वर्षांपूर्वी ‘जामतारा-सबका नंबर आएगा’ नावाची वेबसिरीज रिलीज झाली. ही वेब सिरीजही एका खऱ्या कथेवर आधारित होती. ही सिरीज फोनद्वारे केलेल्या फसवणुकीवर आधारित आहे. झारखंडच्या जामतारा जिल्ह्यात बसून अनेक लोक देशभरात सायबर गुन्हे करत होते आणि अजूनही करत आहेत, असे सिरीजमध्ये दाखवण्यात आले आहे. या सिरीजमध्ये स्पर्श श्रीवास्तवने मुख्य भूमिका साकारली आहे. ही सिरीज देखील Netflix वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile