Best OTT Series 2024: Heeramandi ते Panchayat! ‘या’ वर्षी Google वर सर्वाधिक सर्च केलेले शोज, पहा टॉप 5 शो 

Best OTT Series 2024: Heeramandi ते Panchayat! ‘या’ वर्षी Google वर सर्वाधिक सर्च केलेले शोज, पहा टॉप 5 शो 
HIGHLIGHTS

Google ने या वर्षी सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या शोची यादी जाहीर केली आहे.

या यादीत पहिल्या क्रमांकावर अर्थातच 2024 ची सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध सिरीज 'हिरामंडी' आहे.

Mirzapur या सिरीजचे तीन सिझन प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

Best OTT Series 2024: या वर्षी म्हणजे 2024 ला मनोरंजन विश्वात अनेक चित्रपट आणि वेब सिरीज रिलीज करण्यात आले आहेत. हे वर्ष संपत आले असून या वर्षातील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम सिरीज कोणत्या हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अर्थातच प्रेक्षकांनी आपले फेव्हरेट्स आधीच वॉचलिस्टमध्ये ऍड करून ठेवले असतील. आम्ही तुम्हाला सांगतो, खास सिनेरसिकांसाठी Google दरवर्षी Trends प्रकाशित करते. होय, ट्रेंडमधील सर्च 2024 या वर्षाची यादी जाहीर करण्यात आली आहे. गुगलने या वर्षी सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या शोची यादी जाहीर केली आहे, जे OTT वर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. पाहुयात यादी-

Also Read: Best OTT Series For Weekend: 2024 मध्ये ‘या’ जबरदस्त सिरीज आणि चित्रपटांनी केले प्रेक्षकांच्या मनावर राज्य, पहा यादी

Heeramandi

YouTube video player

या यादीत पहिल्या क्रमांकावर अर्थातच 2024 ची सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध सिरीज ‘हिरामंडी’ आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची हिरामंडी ही सिरीज या वर्षाची सर्वात महागडी सिरीज आहे. त्याबरोबरच, संजय लीला भन्साळी यांची ही पहिली वेब सिरीज आहे, जी तुम्हाला प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Netflix वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या सिरीजमध्ये बॉलीवूड प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोईराला, अदिती राव हैदर, सोनाक्षी सिन्हा, रिचा चड्ढा, संजीदा शेख आणि शर्मिन सेहगल मुख्य भूमिकेत आहेत.

Mirzapur

YouTube video player

Mirzapur या सिरीजचे तीन सिझन प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या सिरीजचा तिसरा सिझन या वर्षी रिलीज करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांच्या पसंतीस आला आहे. अली फजल, रसिक गुगल, पंकज त्रिपाठी इ. प्रसिद्ध कलाकार या सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत उपलब्ध आहेत. या सिरीजला imdb वर 8.4 रेटिंग देण्यात आली आहे.

Last Of Us

YouTube video player

लास्ट ऑफ अस हा अमेरिकन पोस्ट-अपोकॅलिप्टिक शो आहे. हा शो Jio Cinema वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. ‘द लास्ट ऑफ अस’ आधुनिक सभ्यतेच्या नाशानंतर 20 वर्षांनी घडते. जोएल जो एक कठोरपणे वाचलेला आहे ज्याला 14 वर्षांच्या एलीला, अत्याचारी अलग ठेवण्याच्या झोनमधून तस्करी करण्यासाठी नियुक्त केले आहे. एक छोटीशी नोकरी लवकरच एक क्रूर आणि हृदयद्रावक प्रवास बनते. Merle Dandridge, Jeffrey Pierce, Bella Ramsey, इ. कलाकार आहेत.

Bigg Boss 17

YouTube video player

बिग बॉस 17 हा छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय रिॲलिटी शो आहे. सीझन 17 गेल्या वर्षी 2023 मध्ये सुरू झाला होता, जो 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात Google वर सर्च करण्यात आला आहे. हा शो TV वर ‘कलर्स’ चॅनेलवर प्रसारित केला जातो. पण टीव्हीसोबत तुम्ही हा शो प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म JioCinema वर पाहू शकता. बिग बॉस 17 चे होस्टिंग बॉलीवूडचे सुपरस्टार अर्थातच सलमान खान यांनी केले होते.

Panchayat

YouTube video player

Panchayat चे पहिले दोन सिझन यशस्वी झाल्यानंतर या शोचा तिसरा सीझन 2024 मध्ये रिलीज झाला आहे. पंचायत ही एक भारतीय हिंदी भाषेतील विनोदी नाटक वेबसिरीज आहे, जी व्हायरल फीव्हरने तयार केली आहे. हा शो प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. या सिरीजमध्ये जितेंद्र कुमार, रघुवीर यादव, नीना गुप्ता, सान्विका, चंदन रॉय, दुर्गेश कुमार, अशोक पाठक, फैसल मलिक आणि सुनीता राजवार यांसारखे भारी कलाकार आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo