Netflix वर उपलब्ध ‘हे’ 5 अतिशय Horror चित्रपट उडवतील तुमच्या रात्रीची झोप, बघा यादी 

Netflix वर उपलब्ध ‘हे’ 5 अतिशय Horror चित्रपट उडवतील तुमच्या रात्रीची झोप, बघा यादी 
HIGHLIGHTS

OTT वर काही भितीदायक पाहायचे असेल तर Netflix हॉरर चित्रपट उपलब्ध

Netflix वर उपलब्ध असलेले 5 हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपट त्यांच्या ट्रेलरसह बघा.

पुढील पाच चित्रपटांमध्ये थ्रिलर आणि सस्पेन्ससोबतच हॉररचा टच पाहायला मिळणार आहे.

सध्याच्या तरुणाई आणि रसिक प्रेक्षकांमध्ये केवळ ऍक्शन, कॉमेडी, थ्रिलर चित्रपटांचेच नाही तर त्यापेक्षा जास्त सस्पेन्स आणि हॉरर चित्रपटांचे सुद्धा क्रेझ आहे. सध्या रसिक प्रेक्षकांना विविध प्रकारचे फीचर फिल्म्स आवडतात. काही लोकांना रोमँटिक चित्रपट आवडतात, तर काहींना थ्रिलर सस्पेन्स चित्रपट आवडतात. पण भयपट बघण्याची मजा ही काही औरचं असते. स्क्रीनवर भयपट बघताना भीतीमुळे घाम जरी फुटायला लागला तरी लोकांना ते पाहायला आवडतात. तुम्हाला सुद्धा असे चित्रपट पाहायला आवडत असतील तर, Netflix वरील पुढील 5 हॉरर चित्रपट पाहायला विसरू नका. बघा यादी-

हे सुद्धा वाचा: रसिक प्रेक्षकांसाठी ‘Zara Hatke Zara Bachke’ चित्रपट लवकरच OTT वर होणार दाखल, ‘या’ प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

Bulbbul

Bulbul हा 1 तास 34 मिनिटांचा चित्रपट Netflix वर उपलब्ध आहे. ज्यामध्ये तृप्ती डिमरी आणि अविनाश तिवारी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर जितके मनमोहक आहे. कथा तितकीच भयानक दाखवण्यात आले आहे.

Under the Shadow

Under the Shadow हा हॉरर चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपटातील कंटेंट अतिशय भयाण आहे. या चित्रपटाची कथा एका आई आणि मुलीभोवती फिरते. चित्रपटात दोन देशांमधील वॉर दाखवते. ज्यामध्ये काही वेळाने आईला कळते की, तिची मुलगी भुताच्या छायेत आहे. आई आपल्या मुलीला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. चित्रपटात Avin Manshadi, Bobby Naderi, Narges Rashidi, Susan Farrokhania इ. कलाकार आहेत.

Jessabelle

जेसाबेल हा चित्रपट रहस्यमय आणि धक्कादायक दृश्यांनी भरलेला आहे. जिसाबेल या चित्रपटात आत्म्याच्या अशा घटना दाखविण्यात आल्या आहेत, ज्यांनी तुम्हाला घाम फुटेल. हा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटात mark webber, sarah snook, joel carter, david andrews इ. कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

the haunting of bly manor

जर तुम्हाला हॉरर आणि सस्पेंस सिरीज पाहण्याची आवड असेल, तर तुम्ही Netflix वर उपलब्ध असलेली ही हॉरर वेब सिरीज पाहू शकता. या शो ची कथा दोन मुलांची काळजी घेण्यासाठी गेलेल्या केअरटेकरची आहे. ही कथा अतिशय भयानक पद्धतीने दाखवण्यात आली आहे. शोमध्ये Victoria Pedretti, Kate Siegel, Amelia Eve, Rahul Kohli इ. कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

The Midnight Club

Netflix वर उपलब्ध The Midnight Club हॉरर शोजच्या चाहत्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. हा चित्रपट एका पुनर्वसन केंद्रावर आधारित आहे, ज्यामध्ये रुग्णाचा मृत्यू अगदी जवळून दाखवण्यात आला आहे. या सिरीजचा पहिला भाग 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. या शोमध्ये ruth codd, iman benson, Igby Rigney, Samantha Sloyan इ. कलाकार आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo