Smartron tBook आता ऑफलाईनही झाला विक्रीसाठी उपलब्ध

Smartron tBook आता ऑफलाईनही झाला विक्रीसाठी उपलब्ध
HIGHLIGHTS

Smartron tBook ४२,९९९ रुपयाच्या किंमतीत उपलब्ध आहे आणि ह्यासोबत एक कीबोर्ड सुद्धा मिळत आहे.

भारतीय कंपनी Smartron ने एप्रिलमध्ये बाजारात आपला नवीन टॅबलेट tBook लाँच केला होता. आतापर्यंत हा स्मार्टफोन केवळ ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध होता. मात्र आता हा फोन ऑफलाइनसुद्धा सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. हा Redington India वरुन खरेदी करु शकता. ह्याची किंमत ४२,९९९ रुपये आहे.

हा टॅबलेट ग्रे+ऑरेंज आणि पुर्ण ग्रे रंगात उपलब्ध आहे. तसेच ह्याच्या कीबोर्डला आपण मॅग्नेटिक स्ट्रीपद्वारे जोडू शकता.

हेदेखील पाहा – [Marathi] LeEco Super 3 TVs – LeEco सुपर 3 टीव्ही फर्स्ट लूक

tBook च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 12.2 इंचाची IPS डिस्प्ले 2560×1600 पिक्सेलसह मिळते. ह्यात आपल्याला 64-बिटचे इंटेल कोर M प्रोसेसर मिळत आहे, जो 2Ghz ची गती देतो.

ह्यात आपल्याला 4GB रॅमसुद्धा मिळत आहे. ह्यात 128GB ची SSD स्टोरेज मिळत आहे, जे आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो.
 

हेदेखील वाचा – भारतीय बाजारात सर्वाधिक विकले गेलेले हे नोकियाचे जबरदस्त फोन्स…

ह्यात 5 मेगापिक्सेलचा ऑटोफोकस रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळत आहे. त्याशिवाय ह्या टॅबमध्ये आपल्याला 37W.hr ची आकर्षक बॅटरीसुद्धा मिळत आहे, जो कंपनीनुसार १० तासांचा बॅटरी बॅकअप देते.

 

हेदेखील वाचा – BSNL ने आपल्या लँडलाइन यूजर्ससाठी केली मोफत अनलिमिटेड कॉलिंगची घोषणा
हेदेखील वाचा – सॅमसंगने भारतात लाँच केला गॅलेक्सी नोट 7 स्मार्टफोन, किंमत ५९,९९० रुपये

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo