शाओमीने लाँच केला अॅनड्रॉईड TV 6.0 वर चालणारा Mi बॉक्स

शाओमीने लाँच केला अॅनड्रॉईड TV 6.0 वर चालणारा Mi बॉक्स
HIGHLIGHTS

हा डिवाइस 60fps पर्यंत 4k व्हिडियोजला स्ट्रीम करतो. ज्याला अमेरिकेमध्ये लवकरच लाँच केले जाईल.

चीनी कंपनी शाओमीने एक नवीन Mi बॉक्स गुगल I/O 2016 च्या सेट-टॉप बॉक्सचा खुलासा केला आहे. हा एक असा डिवाइस आहे, जो अॅनड्रॉईड TV 6.0 वर चालतो आणि हा सेट टॉप बॉक्स60fps पर्यंत 4k व्हिडियोजला स्ट्रीम करतो. हा डिवाइस गुगल कास्टलासुद्धा सपोर्ट करतो, ज्याने यूजर्स आपल्या फोन आणि टॅबलेट्सने फोटोज, व्हिडियो आणि म्यूजिक स्ट्रीम करु शकतो. त्याशिवाय हा यूजर्सला त्यांच्या गरजेनुसार, गुगल प्ले आणि यूट्युबच्या व्हिडियोजची शिफारस करु शकतो. त्याशिवाय Mi बॉक्ससह यूजरला एक ब्लूटुथ रिमोट कंट्रोलसुद्धा मिळतो, जो व्हॉईस सर्च सपोर्ट करतो आणि हा Mi गेम कंट्रोलरलासुद्धा सपोर्ट करतो. नवीन Mi बॉक्सला लवकरच अमेरिकेत लाँच केले जाईल.
 

हा Mi बॉक्स 2GHz क्वाड-कोर Cortex-A53 प्रोसेसर 2GB रॅमसह येईल. ह्याच्या इतर वैशिष्ट्यांविषयी सांगायचे झाले तर, ह्यात 750MHz माली 450 GPU सुद्धा असेल. ह्यात 8GB चे स्टोरेज सपोर्ट मिळेल. ज्याने आपण USB ड्राइवच्या साहाय्याने वाढवू शकतो. हा HDMI 2.0a पोर्ट आणि एक USB 2.0 पोर्टला सपोर्ट करतो. Mi बॉक्स डॉल्बी डिजिटल प्लस आणि DTS सराउंड साउंडलासुद्धा सपोर्ट करेल. हा Mi गेम कंट्रोलरलासुद्धा सपोर्ट करेल.

शाओमीच्या Global VP, Hugo Barra ने काही दिवसांपूर्वी नवीन Mi बॉक्सचे परीक्षण केले होते. कंपनीने आधीपासून असा विचार केला होता की, कंपनी नवीन Mi बॉक्स किंवा अॅनड्रॉईड टीव्ही OS वर चालणारा Mi टीव्ही लाँच करेल.

हेदेखील वाचा – Yu चा यू यूनिकॉर्न आज लाँच न होता ३१ मे ला होणार लाँच
हेदेखील वाचा – 
तीन नवीन प्रकारात लाँच होणार आयफोन 7

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo