Xiaomi ने Mi ईयरफोन आणि Mi ईयरफोन बेसिक भारतात केले लॉन्च, सुरुवाती किंमत 399 रुपये

Updated on 21-Mar-2018
HIGHLIGHTS

दोन्ही ईयरफोन शाओमी च्या ऑनलाइन स्टोर Mi.com वर सेल साठी उपलब्ध आहेत.

भारतीय बाजारात आपली एक मजबूत जागा बनवणारी चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी ने ईयरफोन चे 2 नवीन मॉडेल भारतात लॉन्च केले आहेत. शाओमी ने Mi ईयरफोन लॉन्च केला आहे, ज्याची किंमत 699 रुपये आहे. हे ईयरफोन ब्लॅक आणि सिल्वर कलर च्या 2 ऑप्शन मध्ये येतो. 

शाओमी ने Mi ईयरफोन बेसिक च्या नावाने दूसरे ईयरफोन फोन लॉन्च केले आहेत, ज्यांची किंमत 399 रुपये आहे. हे ईयरफोन ब्लॅक आणि रेड(लाल) कलर आप्शन मध्ये येतात. दोन नवीन ईयरफोन लॉन्च करण्या व्यतिरिक्त शाओमी ने Mi इन-ईयर हेडफोन बेसिक च्या किंमतीत पण कपात केली आहे. हे ईयरफोन 499 रुपयांच्या किंमती ऐवजी आता 399 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. 

शाओमी च्या अधिकृत वेबसाइट वरील माहितीनुसार, Mi इयरफोंस एक वायर्ड रिमोट सुविधा देतात, ज्याने यूजर्सना कॉल उचलने आणि वॉल्यूम कंट्रोल करता येईल. यांच वजन 14 ग्राम आहे, हे 3 वेगवेगळ्या XS, S आणि L साइज च्या ईयर टिप्स सह येतात. Mi इयरफोंस बनवण्यासाठी वापरण्यात येणारी केबल Kevlar फाइबर केबल असते, जी टेंगल-फ्री असल्याचा दावा करण्यात येतो. 

Mi इयरफोन बेसिक, लाल कलर अॉप्शन सह खासकरून भारतासाठी डिजाइन करण्यात आले आहे. Mi इयरफोन बेसिक, अल्ट्रा-लो बास देतो. माइक आणि वॉल्यूम नियंत्रकाच्या रुपात काम करण्या सोबत या ईयरफोन चा वायर्ड रिमोट यूजरला म्यूजिक प्ले किंवा स्टॉप करण्यास मदत करतो. Mi इयरफोन बेसिक मॉडल मध्ये टेंगल-फ्री केबल ची सुविधा नाही आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :