ह्या डिवाइसमध्ये मायक्रो-एसडी कार्डचे स्लॉट दिले गेले आहे, ज्याच्या माध्यमातून स्पीकरवर डायरेक्ट गाणी ऐकू शकता येतील. अॅल्यूमिनियम बॉडीमध्ये बनलेल्या ह्या Mi ब्लूटुथ स्पीकरचे वजन केवळ २७० ग्रॅम आहे.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी शाओमीने बाजारात आपला नवीन Mi ब्लूटुथ स्पीकर सादर केले आहे. कंपनीने ब्लूटुथ स्पीकरची किंमत १,९९९ रुपये ठेवली आहे. कंपनीने दिल्लीमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते,त्या कार्यक्रमाता हा ब्लूटुथ स्पीकर लाँच केला. त्याचबरोबर कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन शाओमी रेडमी नोट 3 सुद्धा लाँच केला आहे.
शाओमी Mi ब्लूटुथ स्पीकर ह्या महिन्यातच विक्रीसाठी उपलब्ध होईल आणि ह्याला mi.com वेबसाइटच्या माध्यमातून खरेदी केले जाऊ शकते. ह्याआधी कंपनीने mi ब्लूटुथ स्पीकरला भारतात लाँच केले होते.
शाओमी Mi ब्लूटुथ स्पीकरमध्ये 1500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी 8 तासांपर्यंत म्यूजिक प्लेबॅक देण्यास सक्षम आहे.
ह्या डिवाइसमध्ये मायक्रो-एसडी कार्डचे स्लॉट दिले गेले आहे, ज्याच्या माध्यमातून स्पीकरवर डायरेक्ट गाणी ऐकू शकता येतील. अॅल्यूमिनियम बॉडीमध्ये बनलेल्या ह्या Mi ब्लूटुथ स्पीकरचे वजन केवळ २७० ग्रॅम आहे.
त्याशिवाय शाओमी Mi ब्लूटुथ स्पीकरला ब्लूटुथच्या माध्यमातून फोनवरुन कनेक्ट झाल्यानंतर कॉलचे उत्तर दिले जाऊ शकते. Mi ब्लूटुथ स्पीकरमध्ये मायक्रो-एसडी कार्डसह ऑक्स इन पोर्टसुद्धा दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्यात दिल्या गेलेल्या ब्लूटुथ 4.0 द्वारा आपल्या डिवाइसशी अगदी सहजपणे कनेक्ट करु शकतो.