टेक कंपन्या आता ग्राहकांच्या सोयीसाठी बरेच नवनवीन उपकरण बाजारात उपलब्ध करून देत आहेत. सध्याची तरुणाई ही उपकरणे जास्तकरून वापरताना दिसत आहेत. फक्त कामासाठीच नाही तर आता स्वतःच एक स्टायलिश लुक तयार करण्यास देखील या उपकरणांचा वापर तरुणाईमध्ये होताना दिसत आहे. एकंदरीत या नवनवीन उपकरणांची तरुणाईमध्ये खास क्रेझ बघायला मिळतेय. या यादीमध्ये आता आणखी एक उपकरण समाविष्ट होत आहे.
Ubon कंपनी प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करण्यासाठी प्रयत्न करत असते. कधी ते सौरऊर्जेसह स्पीकर लाँच करतात, तर कधी पॉवर बँक असलेली डायरी सादर करून ग्राहकांना आश्चर्यचकित करतात. आता कंपनीने टच कंट्रोलसह UBON CL-110 नावाचा वायरलेस नेकबँड लाँच केला आहे. बहुधा भारतीय बाजारपेठेत टच कंट्रोल्ससह येणारा हा पहिला नेकबँड आहे. चला तर जाणून घेऊयात नेकबँडबद्दल सविस्तर माहिती…
UBON CL-110 ची बॅटरी 30 तास नॉन-स्टॉप प्लेटाइम प्रदान करते, असा दावा कंपनीकडून केला जातो. यात कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ v5.2 आहे, ज्याची रेंज 10 मीटर आहे. UBON CL-110 ला कनेक्ट झाल्यावर बाहेरचा आवाज येणार नाही, असा दावादेखील कंपनीने केला आहे. यामध्ये व्हॉइस कॅन्सलेशन देखील आहे.
UBON CL-110 मध्ये 200mAh रिचार्जेबल बॅटरी आहे, जी Type-C चार्जिंगसह येते. Ubon UBON CL-110 मधील हा नेकबँड शायनिंग आणि वजनाने हलका आहे. यात मॅग्नेटिक इअरबड्स आहेत, ज्यामुळे ते जास्त सोयीस्कर होते. शिवाय, यातील टच कंन्ट्रोल फिचर या उपकरणाला युजर-फ्रेंडली बनवतो. नेकबँड CL-110 ब्लॅक आणि सिल्व्हर कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. या नेकबँडची एकूण किंमत 3,999 रुपये आहे.