जागतिक बाजारपेठेनंतर, Sony ने आता भारतातही आपले प्रीमियम TWS इयरबड्स Sony LinkBuds लाँच केले आहेत. हे बड्स वापरकर्त्यांना एक खास 'नेव्हर ऑफ' वियरिंग एक्सपेरियन्स देतात, असे कंपनीने म्हटले आहे. सोनीचे हे बड्स Apple, Samsung आणि JBL सारख्या कंपन्यांच्या प्रीमियम इयरबड्सशी स्पर्धा करतात. Sony Linkbuds ची किंमत 19,990 रुपये आहे.
हे सुद्धा वाचा : Jio, Airtel आणि Vi वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी: 5G येण्यापूर्वी टॅरिफ किमती वाढवण्याची शक्यता
4 ते 12 ऑगस्ट दरम्यान बड्सचे प्री-बुकिंग करता येईल. जर तुम्ही या बड्सचे प्री-बुकिंग केले तर तुम्हाला ते 19,990 ऐवजी केवळ 12,990 रुपयांना मिळतील. पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये येत असलेल्या या बड्सची विक्री १३ ऑगस्टपासून सुरू होईल. सोनीच्या रिटेल स्टोअर्सव्यतिरिक्त, ते ऑफलाइन आणि ऑनलाइन रिटेल स्टोअरमधून देखील खरेदी केले जाऊ शकतात.
Sony लिंक बड्स एका अनोख्या ओपन रिंग डिझाइनसह येतात. ते आकाराने खूपच लहान आहेत आणि त्यांचे वजन फक्त 4 ग्रॅम आहे. हे बड्स वापरकर्त्याच्या कानात सहज बसतात. बड्स 5 वेगवेगळ्या आकाराच्या सपोर्टरसह येतात. यामुळे ते प्रत्येक कानाच्या आकारासाठी आरामदायक बनतील. दमदार साउंड कॉलिटीसाठी, 12 मिमी रिंग ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. कंपनीने हे बड्स ऑडिओ ट्रान्सपरन्सीसाठी डिझाइन केले असल्याचे सांगितले जात आहे.
Sony LinkBuds उत्तम कॉल कॉलिटीसाठी अचूक व्हॉइस पिकअप टेक्नॉलॉजी देखील वापरते. हे वापरकर्त्यांना 360 रिअल ऑडिओ आणि अडॅप्टिव्ह व्हॉल्यूम कंट्रोल देखील देतात. त्यांची खास गोष्ट अशी आहे की, जेव्हा वापरकर्ता एखाद्याशी बोलत असतो तेव्हा ते आपोआप पॉज होतात. स्पीक टू चॅट असे या फीचरचे नाव आहे.
ऍमेझॉन अलेक्सा आणि गुगल असिस्टंट सपोर्ट असलेल्या या बड्सची बॅटरीही खूप पॉवरफुल आहे. कंपनीचा दावा आहे की, पूर्ण चार्ज केल्यावर बड्स 5.5 तास टिकतात. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ 5.2 देण्यात आला आहे. त्यासोबतच, यामध्ये फास्ट पेअर तंत्रज्ञानही दिले गेले आहे.