Ink’d वायरलेसमध्ये लो प्रोफाइल फ्लेक्स कोलार देण्यात आले आहे आणि हा ७ तासांची बॅटरी लाईफ देण्याचा दावा करतो.
Skullcandy ने आपले नवीन हेडफोन्स लाँच केले. हा ब्लूटुथ इनेबल्ड आणि वायरलेस हेडफोन्स आहेत, ज्याला Ink’d असे नाव दिले आहे. ह्या हेडफोनची किंमत ३,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. Skullcandy नुसार आपण ह्याला सर्व रिटेल स्टोर्समधून खरेदी करु शकता.
अलीकडेच sennheiser ने भारतात आपले नवीन हेडफोन्स HD 630VB लाँच केले होते, ह्याची किंमत ३९,९९० रुपये होती. कंपनीचा दावा आहे की, ह्या हेडफोन्समध्ये रोटरी बेस डायल आहे, ज्याच्या साहाय्याने यूजर्स बेस रिस्पॉन्सला आपल्याप्रमाणे सेट करु शकतो. ह्याच्या माध्यमातून यूजर्स म्यूजिकला कंट्रोल करु शकतो आणि कॉल्ससुद्धा घेऊ शकता.
हे हेडफोन्स गोल आहेत. कंपनीचा दावा आहे की, हे बॅलेंस्ड, ऑडियोफिल-ग्रँड साउंड देतील आणि ह्याचे डिझाईन नॉइज-आयसोलेटिंग असेल. हे हेडफोन्स डायनॅमिक ड्रायव्हर्ससह लाँच केले गेले आहेत आणि ह्याला क्लोज्ड-बॅक डिझाईनसह लाँच केले गेले आहे.