ऑडियो डिवायसेस निर्माता कंपनी स्कलकँडीने भारतीय बाजारात आपला नवीन ब्लूटुथ हेडफोन स्कलकँडी ग्राइंड वायरलेस लाँच केला आहे. कंपनीने भारतीय बाजारात आपल्या ह्या डिवाइसची किंमत ६,४९९ रुपये ठेवली आहे. हा हेडफोन भारतात टाटा क्रोमा स्टोर्स वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
स्कलकँडी ग्राइंड वायरलेस ब्लूटुथ हेडफोनचे डिझाईन खूपच साधे आणि युनिक आहे. ह्यात एक अॅप्लिफायर आहे, जो हायर पॉवर रेटिंग देतो. ह्याची रेंज खूपच उत्कृष्ट आहे. हा खूप हलका आहे. ह्यात असलेली बॅटरी १२ तासांपर्यंत चालते. ह्याच्या उजव्या ईयर कपमध्ये वॉल्यूम बटन्स आहेत.
हेदेखील वाचा – ७००० रुपयांच्या किंमतीत येणारे ५ उत्कृष्ट स्मार्टफोन्स
ब्लूटुथ हेडफोन लाँच करण्याची कल्पना चांगली आहे, कारण आजकाल बाजारातील मोबाईल निर्माता कंपन्या फोन्समधील 3.5mm हेडफोन जॅक काढत आहे. LeEco ने तर Le 2 आणि Le मॅक्स 2 मधून हेडफोन जॅक काढला आहे. सध्यातरी मोटो Z मध्ये हेडफोन जॅक नाही. अशीही बातमी मिळत आहे की, आयफोन 7 मध्येही हेडफोन जॅक असणार नाही.
हेदेखील वाचा – अल्टीमेट ईयर्स UE बूम 2 स्पीकर लाँच, किंमत १५,९९५ रुपये
हेदेखील वाचा – HTC डिझायर 630 स्मार्टफोन भारतात झाला विक्रीसाठी उपलब्ध