Sennheiser ची HD400 सीरिज आतापर्यंत सर्वोत्कृष्ट अशी रेंज राहिली आहे आणि आता ह्या जर्मन हेडफोन स्पेशालिस्टने आपल्या ह्या रेंजमध्ये आपले तीन नवीन मॉडल लाँच केले आहे.
Sennheiser ची HD400 सीरिज आतापर्यंत सर्वोत्कृष्ट अशी रेंज राहिली आहे आणि आता ह्या जर्मन हेडफोन स्पेशालिस्टने आपल्या ह्या रेंजमध्ये आपले तीन नवीन मॉडल लाँच केले आहेत. हे मॉडल आहेत The Sennheiser HD 451 (Rs. 5,000) HD 461 (Rs. 5,990) आणि HD 471 (Rs. 7,990). ह्यांना कंपनीच्या ऑफिशियल ई-स्टोरच्या माध्यमातून खरेदी करु शकतात.
ह्या तिघांचे डिझाईन खूपच उत्कृष्ट आणि आकर्षक आहे. ह्यांच्या माध्यमातून आपण अधिकाधिक चांगल्या प्रकारच्या संगीताचा आनंद घेऊ शकाल. त्याचबरोबर ह्याची किंमत ५००० रुपये आहे, जी खूपच फायदेशीर आहे.
ह्यांच्या लाँचवेळी Sennheiser चे कंस्झ्यूमर सेगमेंटचे डायरेक्टर, कपिल गुलाटी यांनी सांगितले आहे की, “ह्या नवीन HD400 सीरिजच्या हेडफोन्सच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना एक उत्कृष्ट अनुभव देऊ. त्याचबरोबर ह्याचे डिझाईनही खूपच आकर्षक आहे.”