Sennheiser ने भारतात आपले नवीन हेडफोन्स HD 630VB लाँच केले आहेत. ह्याची किंमत ३९,९९० रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, ह्या हेडफोन्समध्ये रोटरी बेस डाईल वापरण्यात आले आहे, ज्याच्या माध्यमातून यूजर्स बेस रिस्पॉन्सला आपल्याला हवे तसे सेट करु शकता. ह्याच्या माध्यमातून यूजर्स म्यूझिकला कंट्रोल करु शकतो आणि कॉल्ससुद्धा करु शकता.
हे हेडफोन्स गोल आहेत. कंपनीचा दावा आहे की हा बॅलेंस्ड, ऑडियोफिल-ग्रँड साउंड देतील आणि ह्याचे डिझाईन नॉईज-आयसोलेटिंग असेल. हे हेडफोन्स डायनॅमिक ड्रायव्हर्ससह लाँच केले गेले आहेत आणि ह्यांना क्लोज्ड-बॅक डिझाईनसह लाँच केले गेले आहे.
हेदेखील पाहा – …तर असा आहे जगातील सर्वात महागडा स्मार्टफोन
ह्याआधी Senniheiser ने भारतात आपले HD400 आणि Momentum रेंज सादर केली होती. कंपनी हळूहळू भारतात आपले प्रोडक्ट लाँच करुन आपली लाईनअप वाढवण्याच्या प्रयत्नात आहे.
हेदेखील वाचा – महिंद्रा eVerito इलेक्ट्रिक कार भारतात लाँच, किंमत ९.५० लाखांपासून सुरु
हेदेखील वाचा – planar magnetic टेक्नॉलॉजीसह येणारा जगातील पहिला हेडफोन लाँच