SAMSUNG च्या नुकत्याच लाँच झालेल्या इयरबड्सवर मिळणार मोठी ऑफर, जाणून घ्या डील

Updated on 26-Aug-2022
HIGHLIGHTS

Samsung Galaxy Buds2 Pro वर मिळणार विशेष ऑफर

हे बड्स AMAZON वर विक्रीसाठी उपलब्ध

याबरोबरच तुम्हाला वायरलेस चार्जर अगदी स्वस्तात मिळेल

31 ऑगस्टपासून SAMSUNG चे अत्याधुनिक साउंड टेक्नॉलॉजी असलेले इअरबड्स Amazon वरून खरेदी करता येतील. त्यांच्या आवाजाची गुणवत्ता इतकी उत्तम आहे की, हे इअरबड्स कानात घातल्यावर वाऱ्याचा आवाजही ऐकू येत नाही. 20 हजार किमतीच्या या इअरबड्समधील अशा ध्वनी तंत्रज्ञानामुळे कॉल आणि संगीत ऐकण्याचा वेगळा अनुभव मिळेल. या इयरबड्सच्या लॉन्चमध्ये सॅमसंगचा नवा वायरलेस चार्जर अवघ्या 499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

हे सुद्धा वाचा : 5G देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी दोन तीन वर्षांचा कालावधी लागेल

Samsung Galaxy Buds2 Pro , Bluetooth Truly Wireless in Ear Earbuds with Noise Cancellation (White) + Samsung Original Wireless Charger Pad, Black या कॉम्बोची किंमत 23,298 रुपये आहे, परंतु लाँच  ऑफरमध्ये 20% सूट मिळत आहे. त्यानंतर तुम्ही 18,489 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. हे इयरबड्स पर्पल, व्हाइट आणि ग्रेफाइट कलरमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. वायरलेस चार्जरमध्ये ब्लॅक आणि व्हाईट असे दोन कलर ऑप्शन आहेत.

Samsung Galaxy Buds2 Pro

या इअरबड्समध्ये ANC टेक्नॉलॉजी आहे, जे ऑन केल्यावर बाहेरचा कोणताही आवाज ऐकू येत नाही. या टेक्नॉलजीमुळे, कॉल करताना किंवा म्युझिक ऐकताना हवेचा आवाजही ऐकू येत नाही. क्लियर ऑडिओसाठी यात 3 SNR (सिग्नल टू नॉइज रेशो) माइक आहेत.

या इअरबड्समध्ये 24-बिट हाय-फाय ऑडिओ आहे. हा एक ऑडिओ अल्गोरिदम आहे, जो हाय कॉलिटी देतो. यात इंटेलिजेंट 360 ऑडिओ आहे. कानाच्या सोयीनुसार डिझाइन केलेले, या इअरबड्समध्ये विंड फ्लो टेक्नॉलॉजी  आहे, ज्यामुळे कानावर कमीत कमी दाब पडतो. ANC टेक्नॉलॉजीसह, ते 5 तासांपर्यंत सतत प्लेबॅक टाइम देतात. ANC शिवाय, ते सुमारे 18 तास चालू शकतात. त्याबरोबरच, बड्स IPX7 पाणी प्रतिरोधक रेटिंग आहे.

वायरलेस चार्जर

 या वायरलेस चार्जरमध्ये इनबिल्ट कूलिंग सिस्टीम आहे. तो फोन किंवा कोणतेही उपकरण अतिशय जलदरित्या चार्ज करतो. हा चार्जर 15W चे फोन किंवा इतर कोणत्याही डिव्हाइसला ओवर हीटिंग होण्यापासून देखील संरक्षित करतो.

चार्जरची रचना आणि लूक खूपच कॉम्पॅक्ट आहे आणि ते सहजपणे कुठेही नेता येईल. हा वायरलेस चार्जर तुमचा फोन किंवा इअरबड कधीही सहजपणे चार्ज करू शकतो. या वायरलेस चार्जरमध्ये ब्लॅक आणि व्हाईट असे दोन रंग पर्याय आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :