Samsung ने लाँच केले Galaxy Buds 3 आणि Buds 3 Pro नवे इयरबड्स, AI करेल लाइव्ह ट्रान्सलेशन

Updated on 11-Jul-2024
HIGHLIGHTS

Samsung Galaxy Unpacked Event मध्ये Samsung Galaxy Buds 3 आणि Galaxy Buds 3 Pro लाँच

Samsung च्या या दोन्ही बडमध्ये ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन (ANC) देण्यात आले आहे.

Galaxy Buds 3 सिरीज इंटरप्रिटर आणि व्हॉइस कमांडसह AI फीचर्ससह येतो.

बुधवारी 10 जुलै रोजी पार पडलेल्या पॅरिसमधील Samsung Galaxy Unpacked Event मध्ये Samsung Galaxy Buds 3 आणि Galaxy Buds 3 Pro लाँच करण्यात आले. हे जबरदस्त इयरबड्स अनेक अप्रतिम AI फीचर्ससह सादर करण्यात आले आहेत. Samsung च्या या दोन्ही बडमध्ये ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन (ANC) देण्यात आले आहे. याशिवाय याला वॉटर रेझिस्टंटसाठी IP57 रेटिंग मिळाली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Samsung Galaxy Buds 3 आणि Galaxy Buds 3 Pro ची किंमत आणि सर्व तपशील-

Samsung Galaxy Buds 3, Galaxy Buds 3 Pro ची किंमत

लेटेस्ट Samsung Galaxy Buds 3 ची अमेरिकेत सुरुवातीची किंमत $179.99 म्हणजेच जवळपास 15,000 रुपये आहे. तर, Galaxy Buds 3 Pro ची किंमत $249.99 म्हणजेच जवळपास 21,000 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर, भारतात Buds 3 ची किंमत 14,999 रुपये आहे आणि Buds 3 Pro ची किंमत 19,999 रुपये आहे.

दोन्ही बड्सचे प्री-ऑर्डर सुरू झाले आहे. हे बड्स 24 जुलैपासून खरेदीसाठी उपलब्ध होतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे दोन्ही बाँड्स सिल्वर आणि व्हाईट कलर ऑप्शन्ससह सादर केले गेले आहेत.

Samsung Galaxy Buds 3 सिरीज AI फीचर्सने सुसज्ज

Galaxy Buds 3 सिरीज इंटरप्रिटर आणि व्हॉइस कमांडसह AI फीचर्ससह येतो. इंटरप्रिटर मोड कोणतीही भाषा ऐकू शकतो आणि रिअल टाइममध्ये ती तुमच्या भाषेत भाषांतरित करू शकतो. आवाज नियंत्रित केला जाऊ शकतो आणि व्हॉइस कमांडद्वारे म्युझिक प्ले-पॉज करता येईल.

Samsung Galaxy Buds 3, Galaxy Buds 3 Pro चे तपशील

Samsung Galaxy Buds 3 सिरीज नवीन डिझाइनसह लॉन्च करण्यात आली आहे. Galaxy Buds 3 ओपन टाईप डिझाईनसह येतात. तर, प्रो मॉडेल इन-इयर टाईप डिझाइनसह येते. Galaxy Buds 3 Pro मध्ये ॲम्बियंट साउंड मोड आणि व्हॉईस डिटेक्ट फिचर आहे, जो आवाज आणि मानवी आवाज सहजपणे ओळखू शकतो. Galaxy Buds 3 11mm वन-वे डायनॅमिक ड्रायव्हरसह येतो. तर, Galaxy Buds 3 Pro टू-वे 10.5mm डायनॅमिक स्पीकर आणि 6.1mm प्लॅनरसह येतो. दोन्ही मॉडेल्ससह तीन मायक्रोफोन उपलब्ध आहेत. वॉटर रेसिस्टंससाठी या दोघांना IP55 रेटिंग मिळाले आहे.

Galaxy Buds 3 मध्ये 48mAh बॅटरी आहे आणि चार्जिंग केस 515mAh बॅटरीसह येईल. बॅकअपसाठी यात 5 तासांचा दावा आहे. तर, चार्जिंग केससह 30 तासांच्या बॅकअपचा दावा आहे. Galaxy Buds 3 Pro मध्ये 53mAh बॅटरी आहे आणि चार्जिंग केसमध्ये 515mAh बॅटरी आहे. Galaxy Buds 3 सिरीजसह कनेक्टिव्हिटीसाठी, ब्लूटूथ 5.4 AAC, SBC, SSC, HiFi आणि SSC UHQ कोडेकच्या समर्थन उपलब्ध आहे. बड्समध्ये ऑटो स्विचचा पर्याय देखील देण्यात आला आहे. या फीचरच्या तुम्ही दोन उपकरणांमध्ये स्विच करू शकता.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :