Samsung ने भारतात आपले नवीन इयरबड Samsung Galaxy Buds 2 Pro लाँच केले आहेत. हे इयरबड्स सॅमसंगच्या 10 ऑगस्ट Galaxy Unpacked इव्हेंट 2022 मध्ये लाँच करण्यात आले आहेत. या मेगा इव्हेंटमध्ये दोन फ्लॅगशिप फोल्डेबल फोन Samsung Galaxy Z Fold 4 आणि Galaxy Z Flip 4 आणि दोन स्मार्टवॉच Samsung Galaxy Watch 5 (40mm) आणि Galaxy Watch 5 Pro (45mm) इयरबड्स लाँच करण्यात आले आहेत.
हे सुद्धा वाचा : Jio चे सुपर प्लॅन्स ! Netflix, Amazon Prime आणि Disney + Hotstar अगदी मोफत, बघा यादी
Samsung galaxy buds 2 pro ग्रेफाइट, बोरा पर्पल आणि व्हाईट या तीन कलर ऑप्शन्स मध्ये लाँच झाले आहे. या इयरबड्सची किंमत जवळपास 17,999 रुपये आहे. Galaxy Buds 2 Pro 26 ऑगस्टपासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ऑफलाइन रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येईल. इयरबड 10 ऑगस्टपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत.
Samsung Galaxy Buds 2 Pro मध्ये Android 12 आधारित One UI 4.0 देण्यात आला आहे. इयरबड्समध्ये 24-बिट Hi-Fi ऑडिओसह हाय डायनॅमिक रेंज आणि क्रिस्टल क्लियर साउंडसह two-way coaxial स्पिकर्स आहेत. यामध्ये इंटेलिजेंट ऍक्टिव्ह व्हॉईस कॅन्सलेशन (ANC) आणि 360 ऑडिओ सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच, इअरबड्समध्ये सिमलेस कनेक्टिव्हिटी आहे आणि Galaxy डिव्हाइसेस आणि सॅमसंग टीव्हीशी कनेक्ट करण्यासाठी SmartThings Find साठी सपोर्ट देखील आहे.
इयरबड्स केससह 515mAh बॅटरी आणि प्रति बडसाठी 61mAh बॅटरी आहे. यासोबतच, यात क्विक चार्जिंगची सुविधाही उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की, इयरबड्स पूर्ण चार्ज केल्यावर ANC सोबत 15 तासांचा प्लेबॅक आणि ANC शिवाय 29 तासांचा प्लेबॅक घेतला जाऊ शकतो. तसेच, बड्स पाणी प्रतिरोधक देखील आहेत.