लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी Redmi ने दोन नवीन इयरबड्स लाँच करून आपला ऑडिओ पोर्टफोलिओ वाढवला आहे. नवीन लाँच झालेल्या इयरबड्सना Redmi Buds 4 आणि Redmi Buds 4 Pro असे नाव देण्यात आले आहे. Redmi Note 11T सिरीज स्मार्टफोनसह हे किफायतशीर इयरबड्स लाँच केले गेले आहेत. Redmiने लाँच केलेले नवीन TWS इयरबड्स OnePlus Buds Z2, Realme Buds यांसारख्या प्रोडक्ट्च्या कॉम्पिटेशनमध्ये आले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात नवीन Redmi Buds 4 आणि Buds 4 Pro चे किंमत आणि स्पेसिफिकेशन…
Redmi Buds 4 ची किंमत 199 युआन म्हणजेच अंदाजे 2,313 रुपये इतकी आहे. तर Redmi Buds 4 Pro ची किंमत 369 युआन म्हणजे अंदाजे 4,290 रुपये आहे. ऑडिओ प्रोडक्ट प्री-ऑर्डरसाठी चीनमध्ये उपलब्ध आहेत. हे बड्स 4 पांढऱ्या आणि हलक्या निळ्या कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहेत, तर प्रो मॉडेलमध्ये पोलर नाइट आणि मिरर लेक व्हाइट कलर ऑप्शन्स आहेत.
Redmi Buds 4 आणि Buds 4 Pro हे दोन्ही इन-इअर डिझाइनसह लाँच केले गेले आहेत. दोन्ही TWS इयरफोन्स IP54 सर्टिफाईड डस्ट आणि वॉटरप्रूफ आहेत. इयरबड्स टच कंट्रोल्स करतात आणि युझर्स बड्सवर टॅप करून विविध ऍक्टिव्हिटीज करू शकतात.
Redmi ने Buds 4 आणि Buds 4 Pro 10mm डायनॅमिक ड्रायव्हर्ससह सुसज्ज केले आहेत. Realme Buds 4 AI इंटेलिजेंट ऍडजस्टमेंटसह 35dB नॉइज कॅन्सलेशन ऑफर करते. याशिवाय प्रो हे मॉडेल हायफाय साउंड क्वालिटी आणि व्हर्च्युअल स्टिरिओ साउंडसह लाँच करण्यात आले आहे. प्रो मॉडेल देखील 43dB पर्यंत नॉईज कॅन्सलेशनसह येते.
ब्रँडचे हे दोन्ही मॉडेल ब्लूटूथ 5.2 कनेक्टिव्हिटी सपोर्टसह येतात. Redmi Buds 4 Pro मध्ये 59ms कमी लेटन्सी मोड आहे. त्याबरोबरच, व्हॅनिला बड्स 4 एकूण 30 तास बॅटरी लाइफ ऑफर करण्यास सक्षम आहेत. तर बड्स 4 प्रो 36 तासांची बॅटरी लाइफ ऑफर करतात. स्टोरेज केस उघडल्यानंतर लगेचच इअरबड्स डिव्हाइसशी कनेक्ट केले जाऊ शकतात.