40 तासांच्या बॅटरीसह Realme चे नवीन इयरबड्स लाँच, किंमतही कमी

40 तासांच्या बॅटरीसह Realme चे नवीन इयरबड्स लाँच, किंमतही कमी
HIGHLIGHTS

नवीन ट्रू वायरलेस इयरबड्स Realme Buds Air 5 Pro लाँच

बड्ससोबत 40 तासांच्या बॅटरी बॅकअपचा दावा

IPX5 वॉटरप्रूफ रेटिंग उपलब्ध

स्मार्टफोन ब्रँड Realme ने आपले नवीन ट्रू वायरलेस इयरबड्स Realme Buds Air 5 Pro लाँच केले आहेत. नवीन TWS इयरबड्स पाण्याच्या प्रतिकारासाठी IPX5 रेटिंगसह येतात. बड्ससोबत 40 तासांच्या बॅटरी बॅकअपचा दावा आहे. चला जाणून घेऊया बड्सची किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स.

Realme Buds Air 5 Pro ची किंमत 

हे बड्स सध्या देशांतर्गत बाजारात सादर करण्यात आले आहे. बड्सची किंमत 399 चीनी युआन म्हणजेच सुमारे 4,722 रुपये आहे. बड्स द सिटी ऑफ सनराईज आणि स्टाररी नाईट डार्क या कलर ऑप्शनमध्ये येतात. सध्या कंपनीने या बड्सची भारतात लाँचबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

Realme Buds Air 5 Pro

Realme Buds Air 5 Pro सह नॉइज कॅन्सलेशनला सपोर्ट करण्यात आला आहे. हा फिचर 50dB पर्यंत आवाज कमी करतो. यात सहा-मायक्रोफोन AI डीप कॉल नॉइज रिडक्शन, बीमफॉर्मिंग नॉईज रिडक्शन टेक्नॉलजीसह ऍडवान्स ENC आणि क्लियर व्हॉइससाठी DNN अल्गोरिदमसह सुसज्ज आहे.

बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, चार्जिंग केससह इयरफोन्सची बॅटरी लाइफ 40 तासांपर्यंत असते. तर चार्जिंग केसशिवाय इयरबड एकाच चार्जवर 11 तासांपर्यंत टिकतात. हे पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 120 मिनिटे लागतात. चार्जिंग केस USB टाइप-C पोर्टला सपोर्ट करते.

 इतर फीचर्समध्ये यात गेमिंगसाठी 40ms लो लेटन्सी मोड आणि IPX5 वॉटरप्रूफ रेटिंग मिळणार आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo