स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme ने आपले नवीन इयरबड्स Realme Buds Air 3 Neo भारतात लाँच केले आहेत. या इअरबड्ससह, कंपनीने भारतात पॅड X, बड्स वायरलेस 2 S, स्मार्ट कीबोर्ड, पेन्सिल, फ्लॅट मॉनिटर आणि Realme वॉच 3 हे उपकरण देखील लाँच केले आहेत. Realme Buds Air 3 Neo मध्ये 10mm BASS ड्रायव्हरसह 88mm चा सुपर लो लेटन्सी मोड मिळतो. ब्लूटूथ 5.2 सपोर्ट आणि फास्ट चार्जिंग पर्याय देखील इअरबड्समध्ये दिसत आहेत. या इअरबड्सच्या इतर स्पेसिफिकेशन्स, किंमत आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊयात…
हे सुद्धा वाचा : अप्रतिम ऑफर ! Samsung Galaxy S20 FE 5G Amazon वर 35,000 रुपयांना उपलब्ध, वाचा सविस्तर
Realme चे नवीन ऑडिओ डिव्हाइस Realme Buds Air 3 Neo बजेट सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. भारतापूर्वी 12 जुलै रोजी देशांतर्गत बाजारात बड्स लाँच करण्यात आले होते. हे बड्स भारतात 1,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहेत, त्याची विक्री 27 जुलैपासून सुरू होईल. Realme चे हे बड्स ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट वरून 1,699 रुपयांच्या प्रास्ताविक किमतीत खरेदी केले जाऊ शकतात. बड्स स्टाररी ब्लू आणि गॅलेक्सी व्हाइट कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहेत.
रिअलमीचे TWS इअरबड्स कर्व डिझाइनसह येतात. बड्सना 10mm BASS ड्रायव्हर्स मिळतात, जे सुपर लो लेटन्सी मोड आणि डॉल्बी ऍटमॉसला 88mm पर्यंत सपोर्ट करतात. बडमध्ये कॉलिंगसाठी ENC आणि ब्लूटूथ 5.2 प्रदान केले आहेत. हे इयरबड एकाच चार्जवर 7 तास टिकू शकतात. कंपनीचा दावा आहे की, 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये बड्स 2 तासांचा प्लेबॅक टाइम देतात. बड्सना केससह 30 तासांची बॅटरी मिळते.