Ptron Musicbot Evo साउंडबार 999 रुपयांमध्ये लाँच, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

Ptron Musicbot Evo साउंडबार 999 रुपयांमध्ये लाँच, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स
HIGHLIGHTS

Ptron Musicbot Evo साऊंडबार लाँच

नव्या साऊंडबारची किंमत 999 रुपये

फुल चार्ज केल्यावर दहा तासांचा बॅटरी बॅकअप मिळेल

देशांतर्गत कंपनी pTron ने सोमवारी भारतात आपला नवीन साउंडबार Ptron Musicbot Evo लाँच केला. साउंडबार स्लीक आणि मेटॅलिक फ्रंट ग्रिलसह ऑफर केला आहे. Ptron Musicbot Evo साउंडबारला 52mm ऑडिओ ड्रायव्हरसह उत्तम BASS मिळतो. साउंडबारच्या ब्लूटूथ v5.0 सह, ते टीव्ही, लॅपटॉप, टॅब्लेट आणि इतर उपकरणांशी देखील सहजपणे कनेक्ट केले जाऊ शकते.  एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 10 तासांचा बॅटरी बॅकअप मिळेल असा कंपनीचा दावा आहे. जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती… 

हे सुद्धा वाचा : भारीच की ! LG ने आणले दमदार फीचर्ससह दोन पावरफुल लॅपटॉप, तब्ब्ल 21 तास चालेल बॅटरी

Ptron Musicbot Evo 

Ptron Musicbot Evo साउंडबार कॉम्पॅक्ट डिझाइनसह सादर केला गेला आहे. त्यात 52mm ऑडिओ ड्रायव्हर्स मिळतात. साउंडबारमध्ये 10W ऑडिओ आउटपुट आहे, जे 95dB सिग्नल-टू-नॉइज रेशोसह येते. Ptron Musicbot Evo साउंडबारमध्ये व्हॉल्युम ऍडजस्ट करण्यासाठी, ट्रॅक बदलण्यासाठी आणि संगीत म्युझिक प्ले पॉज करण्यासाठी इंटिग्रेटेड कंट्रोल पॅनेल देखील मिळेल.

साउंडबारमध्ये 1,200mAh बॅटरी आहे, याबाबत कंपनीचा दावा आहे की, 100 टक्के चार्ज केल्यानंतर ती 10 तास चालवता येते. साउंडबारच्या ब्लूटूथ v5.0 सह 10 मीटरपर्यंतची कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. इतर कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाल्यास, Ptron Musicbot Evo साउंडबार 3.5mm ऑडिओ जॅक, AUX, TF कार्ड स्लॉट आणि USB पोर्टला सपोर्ट करतो.

Ptron Musicbot Evo ची किंमत 

Ptron चा हा स्पीकर सिंगल ब्लॅक कलर मध्ये सादर करण्यात आला आहे. हे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट वरून 999 रुपयांच्या किमतीत खरेदी केले जाऊ शकते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo