Portronics ने भारतीय बाजारात आपला नवीन हेडफोन Portronics Muffs A लाँच केला आहे. Muffs A वायरलेस हेडफोन बेस्ट ऑडिओ कॉलिटी आणि पावरफुल BASS सह येतात. एका पूर्ण चार्जवर ते 30 तास चालतील, असा कंपनीचा दावा आहे. हा डिवाइस फंकी लुक आणि कंफर्टेबल डिझाइनसह येतो. हेडफोन तीन कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आले आहेत. या वायरलेस हेडफोनमध्ये तुम्हाला कोणते फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स मिळणार आहेत ते जाणून घेऊयात…
हे सुद्धा वाचा : Oppo चा नवा स्मार्टफोन लाँच, मिळणार 12 GB रॅम आणि लेटेस्ट प्रोसेसर, जाणून घ्या इतर फीचर्स
या वायरलेस हेडफोनचा लुक फंकी आहे आणि तो कंफर्टेबल डिझाइनसह येतो. हेडफोनची डिझाईन अर्गोनॉमिक आहे. हेडफोन्समध्ये मेमरी फोम बेस्ड सॉफ्ट आणि रिमूव्हेबल एअर कुशन मिळेल. यात 520mAh बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की, ते पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त 55 मिनिटे लागतात. हेडफोनमध्ये चार्जिंगसाठी USB-C पोर्ट आहे आणि 30 तासांचा दीर्घ बॅटरी बॅकअप आहे.
Portronics Muffs A ला 40mm ड्रायव्हर्स मिळतात. हेडफोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, यात ब्लूटूथ v5.2, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक आहे. यात IPX5 रेटिंग आहे, जे हेडफोनचे पाणी, घाम आणि धूळ यांच्यापासून संरक्षण करते. हेडफोनचे वजन सुमारे 170 ग्रॅम आहे.
Portronics Muffs A वायरलेस हेडफोन ब्लॅक, रेड आणि ब्लू या तीन कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आला आहे. Portronics Muffs A ची किंमत 1,999 रुपये आहे. हे पोर्ट्रोनिक्स अधिकृत वेबसाइट आणि Amazonवरून खरेदी केले जाऊ शकते. हा हेडफोन ऑफलाइन स्टोअरमध्येही उपलब्ध आहे. या हेडफोनसोबत 12 महिन्यांची वॉरंटीही उपलब्ध आहे.