Portronics Muffs XT ब्लूटुथ हेडफोन लाँच, किंमत १,९९९ रुपये
कंपनीचा दावा आहे की, Portronics Muffs XT ब्लूटुथ हेडफोन एकदा चार्ज केल्यास १२ तासांची नॉन स्टॉप गाणी प्ले करु शकतो.
Portronics ने बाजारात आपला नवीन Muffs XT ब्लूटुथ हेडफोन लाँच केला आहे. कंपनीने भारतीय बाजारात आपल्या ह्या फोनची किंमत १,९९९ रुपये ठेवली आहे आणि हा एक ऑन-इयर हेडफोन आहे. ह्यात एक बिल्ट-इन मायक्रोफोन आणि इयर-पॅड माउंटेड कंट्रोल्स आहेत. ह्याद्वारे यूजर म्यूजिक आणि फोन कॉल्स कंट्रोल करु शकतो. कंपनीचा दावा आहे की, Portronics Muffs XT ब्लूटुथ हेडफोन एकदा चार्ज केल्यास १२ तासांची नॉन स्टॉप गाणी प्ले करु शकतो.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात ब्लूटुथ 4.1 दिला गेला आहे आणि हा सर्व प्रकारच्या ब्लूटुथ, इनेबल्ड डिवायसेसशी कनेक्ट होऊ शकतो. Portronics Muffs XT ब्लूटुथ हेडफोन 40mm च्या ड्रायव्हर्ससह येतो आणि ह्यात 195mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी २ तासांच्या आता पुर्णपणे चार्ज होते.
हेदेखील पाहा – फ्लिपकार्टवर अशा ऑफर्स पुन्हा मिळणे नाही, आज आहे शेवटची संधी
Portronics ने अलीकडेच पॉश ब्लूटुथ स्पीकर लाँच केले होते. ज्याची किंमत २,४९९ रुपये होती. हा दोन 3W इन-बिल्ट स्पीकर्ससह लाँच झाला होता. ह्या स्मार्टफोन्सने ब्लूटुथच्या माध्यमातून कनेक्ट केले जाते.
हेदेखील वाचा – शाओमी Mi मॅक्स स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत १४,९९९ रुपयांपासून सुरु
हेदेखील वाचा – नुकतेच लाँच झालेले हे स्मार्टफोन्स एकमेकांना देतात कडक टक्कर