8 जूनपासून ते फ्लिपकार्टवरून 1,599 रुपयांना खरेदी करता येतील.
कंपनीने बॅटरीबाबत 35.5 तासांचा बॅकअप असल्याचा दावा केला आहे.
oraimo ने भारतात आपले नवीन इयरबड्स oraimo FreePods 4 लाँच केले. कंपनीच्या मते, oraimo FreePods 4 प्रीमियम लुकसह कॉलिटी साउंड देतात. FreePods 4 सह क्रिस्टल क्लियर कॉल आणि ऑडिओचा दावा आहे. या इयरबड्सची किंमतही तुमच्या बजेटमध्ये येईल. तसेच, हे इयरबड्स तब्बल 35 तास चालतील, असा कंपनीचा दावा आहे.
oraimo FreePods 4 ची किंमत आणि लाँचिंग ऑफर
oraimo FreePods 4 ची किंमत 1,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. परंतु आजपासून म्हणजेच 8 जूनपासून ते फ्लिपकार्टवरून 1,599 रुपयांना खरेदी करता येईल.
oraimo FreePods 4 चे तपशील
oraimo FreePods 4 मध्ये सक्रिय आवाज रद्दीकरण म्हणजेच ANC फिचर उपलब्ध आहे. वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने बॅटरीबाबत 35.5 तासांचा बॅकअप असल्याचा दावा केला आहे, यात 5 EQ मोड आहेत. यासोबत oraimo साउंड ऍपचे देखील सपोर्ट आहे. या बडसह ट्रान्स्परन्सी मोड देखील उपलब्ध आहे.
जर तुमचे बड्स हरवले तर, Find my device फिचरदेखील ऍपसह समर्थित आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, या बड्ससोबत नॉईज फ्री ऑडिओ, गेमिंगसाठी लो लेटेन्सी मोड आणि पाणी प्रतिरोधकांसाठी बड्ससह IPX5 रेटिंग उपलब्ध आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.