Oppo ने भारतात आपले बजेट इयरबड्स OPPO Enco Buds 2 लाँच केले आहेत. नवीन इअरबड्स हे Enco बड्सचे सक्सेसर आहेत. नवीन इयरबड्स 10mm टायटनाइज्ड ड्रायव्हरसह येतात. Oppo Enco Buds2 हे 28 तासांपर्यंत बॅकअप देऊ शकतात, असा कंपनीचा दावा आहे. Oppo ने घोषणा केली आहे की, नवीन बड्स 31 ऑगस्टपासून Oppo Store आणि Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध असतील.
हे सुद्धा वाचा : Friday Release : या शुक्रवारी हिंदी आणि मराठी चित्रपटांसह 'या' वेब सिरीज होणार रिलीज
नवीन TWS Buds2 ला Dolby Atmos सह Enco लाइव्ह स्टिरिओ साउंड इफेक्ट मिळतो, असा OPPO चा दावा आहे. ज्यात ओरिजिनल साउंड, बास बूस्ट आणि क्लियर व्होकल्स अशा तीन सेटिंग्ज आहेत. TWS ला IPX4-रेटिंग देखील मिळते, ज्यामुळे तुम्हाला वर्कआउट दरम्यान घाम आला तरीही खराब होणार नाही.
तुम्ही Enco Buds2 पूर्णपणे चार्ज करून सात तासांपर्यंत म्युझिक ऐकू शकता. ओप्पोचा दावा आहे की, बड फक्त 10 मिनिट चार्ज करून 1 तासाचा बॅकअप देऊ शकतात. कॉलिंगसाठी Oppo एनको बड्स 2 ला AI डीप नॉईज कॅन्सलेशन अल्गोरिदमसह सुसज्ज आहे, ज्याचा दावा डीप न्यूरल नेटवर्क (DNN) वर आधारित आहे.
TWS लो-लेटेंसी ब्लूटूथ 5.2 ट्रान्समिशनसह येतो, जे अधिक स्थिर कनेक्टिव्हिटीला सक्षम करते. Oppo मोबाईल फोन वापरताना ब्लूटूथ लेटन्सी लेव्हल सर्वात जास्त असते. याचा अर्थ वापरकर्ते आता गेमिंग करताना वायर्ड हेडफोन्सप्रमाणेच ऑडिओ आणि व्हिडिओ सिंक्रोनाइझेशन अनुभवू शकतात.
Oppo ने भारतात आपले इयरबड्स 1,799 रुपयांना लाँच केले आहेत. Oppo Enco Buds 2 सिंगल ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे.