आता बहुतांश कंपन्यांचे स्मार्टफोन 3.5mm हेडफोन जॅकशिवाय येत आहेत आणि दुसरीकडे वायर्ड इअरफोन्सही लाँच केले जात आहेत. OnePlus ने OnePlus Nord Wired लाँच करत भारतीय बाजारपेठेत त्याचा ऑडिओ पोर्टफोलिओ विस्तारित केला आहे. OnePlus Nord सिरीजचा हा एक नवीन सदस्य आहे.
हे सुद्धा वाचा : VIVO चा उत्कृष्ट फोल्डेबल फोन लवकरच बाजारात दाखल होणार, 50MP कॅमेरासह मिळेल दमदार डिस्प्ले
OnePlus Nord वायर्डसह 3.5mm जॅक आहे. OnePlus Nord Wired काही दिवसांपूर्वी Amazon India वर लिस्ट झाला होता. OnePlus Nord Wired ची किंमत 799 रुपये असून 1 सप्टेंबरपासून त्याची विक्री सुरू होईल.
OnePlus Nord वायर्ड कंपनीने त्याचे टाइप-C पोर्ट वायर्ड इयरफोन लाँच केल्यानंतर लगेचच सादर केले आहे. सध्या बाजारात फक्त 3.5mm जॅक असलेले एंट्री लेव्हल फोन शिल्लक आहेत. OnePlus ने स्वतः OnePlus 6T वरून हेडफोन जॅक काढण्यास सुरुवात केली आहे. जरी OnePlus Nord CE, OnePlus Nord CE 2 आणि OnePlus Nord CE 2 Lite सारख्या फोनमध्ये हेडफोन जॅक आहे.
ऑडिओ कंट्रोलसाठी OnePlus Nord Wired मध्ये बटन्स देखील दिली आहेत. या इयरफोनला वॉटर रेसिस्टंटसाठी IPX4 रेटिंग देखील मिळाली आहे. मागील वर्जनप्रमाणेच वनप्लस नॉर्ड वायर्डच्या बडमध्येही मॅग्नेट देण्यात आले आहेत.
याव्यतिरिक्त, यामध्ये 9.2mm ड्रायव्हर आहे ज्याची संवेदनशीलता 110±2dB आहे. त्याचा साउंड प्रेशर 102dB आहे. OnePlus Nord वायर्ड एक इन-इयर स्टाईल डिझाइनसह येणारा इअरफोन आहे. यासोबतच तीन सिलिकॉन टिप्सही मिळतील.