Oneplus च्या सर्वात स्वस्त इयरफोनची पहिली सेल आज, किंमत 1000 रुपयांपेक्षा कमी

Updated on 01-Sep-2022
HIGHLIGHTS

OnePlus Nord वायर्ड इअरफोन्सची पहिली विक्री आज

लेटेस्ट इयरफोन्सची किंमत एक हजार रुपयांपेक्षा कमी

OnePlus अधिकृत वेबसाइट आणि Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध

OnePlus आज 1 सप्टेंबर रोजी भारतात प्रथमच त्यांचे नवीन वायर्ड इअरफोन विकणार आहे. इयरफोन्सची फ्लॅश सेल आज दुपारी  12 वाजल्यापासून सुरू होणार आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही आजच OnePlus आणि Amazon च्या अधिकृत वेबसाइटवरून मोठ्या सवलती आणि अनेक ऑफर्ससह हे इयरफोन्स खरेदी करू शकता. Nord सीरीज अंतर्गत येणारा वनप्लसचा हा पहिला इयरफोन आहे. 

हे सुद्धा वाचा : 48MB रॅम, 128MB स्टोरेजसह Nokia 2660 फ्लिप फोन भारतात लाँच, किंमत 4,699 रुपये

OnePlus Nord Wired Earphones चे फीचर्स

नॉर्ड वायर्ड इयरफोन 102dB साउंड प्रेशरसह 9.2mm ड्रायव्हर सेटअपसह येतात. हे इअरफोन्स इन-इअर स्टाइल डिझाइन आणि अँगल डिझाइनसह सुसज्ज आहेत. जे ग्राहकांना एक कंफर्ट फिट देतील. यामध्ये तुम्हाला तीन सिलिकॉन इअरटिप्सध्ये S, M, L पर्याय मिळतात.

याव्यतिरिक्त, कंट्रोल्ससाठी यात इन-लाइन कंट्रोल बटण आहेत, ज्यामध्ये व्हॉल्यूम अप, व्हॉल्यूम डाउन आणि मल्टी-फंक्शन बटण समाविष्ट आहे. जे डबल प्रेस, ट्रिपल प्रेस, प्रेस आणि होल्ड ऑपरेशन करू शकतात. शिवाय, घाम आणि पाण्याच्या संरक्षणासाठी इयरफोन IPX4 रेट केलेले आहेत. हे नवीन नॉर्ड वायर्ड इयरफोन मॅग्नेटसह येतात जे म्युझिक प्ले करण्यासाठी/पॉज करण्यासाठी एकत्र चिकटून राहतात.

OnePlus Nord वायर्ड इअरफोन्सची किंमत

OnePlus Nord वायर्ड इअरफोन्स भारतात फक्त 799 रुपयांना लाँच केले गेले आहेत. याशिवाय ते ब्लॅक कलर पर्यायामध्ये ऑफर केले गेले आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :