OnePlus Nord Buds CE भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स

Updated on 01-Aug-2022
HIGHLIGHTS

OnePlus Nord Buds CE भारतात लाँच

OnePlus Nord Buds CE ची किंमत 2,299 रुपये

10 मिनिटांसाठी डिव्‍हाइस चार्ज केल्‍यास 81 मिनिटांपर्यंत चालतात.

OnePlus ने आज फक्त भारतातील पहिला TWS Nord Buds CE लाँच केला. इयरबड्सची विक्री 4 ऑगस्टला  दुपारी 12 वाजता OnePlus.in, OnePlus Store ऍप, Flipkart.com, OnePlus एक्सपेरियन्स स्टोअर्स आणि ऑफलाइन पार्टनर स्टोअर्सवर सुरू होईल. OnePlus Nord Buds CE ची किंमत 2,299 रुपये ठेवण्यात आली आहे. हे बड्स मिस्टी ग्रे आणि मूनलाईट व्हाइट कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आले आहेत. कंपनीने एप्रिल 2022 मध्ये OnePlus Nord Buds लाँच केले.

हे सुद्धा वाचा : Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलची तारीख जाहीर, स्मार्टफोनवर मिळेल तब्बल 40% पर्यंत सूट

Nord Buds CE 13.4mm Titanium डायनॅमिक ड्रायव्हर्स आणि पॉवरफुल बेस आणि इमर्सिव्ह अनुभव ऑफर करतो. बड्सना क्लोज ट्यूब डिझाईन देण्यात आली आहे. हे इयरबड्स चार इक्वेलायझर मोड्ससह येतात, ज्यात बेस, सेरेनेड, बॅलन्स्ड आणि जेंटल मोड समाविष्ट आहे.

OnePlus चा दावा आहे की, बड्स 4.5 तास बॅटरी लाइफ आणि चार्जिंग केस चालू असताना 20 तास टिकतात. केस जलद चार्जिंगला समर्थन देतात. OnePlus चा दावा आहे की, 10 मिनिटांसाठी डिव्‍हाइस चार्ज केल्‍यास 81 मिनिटांपर्यंत चालतात. 

OnePlus नुसार, Nord Buds CE ब्लूटूथ 5.2 आणि 94 ms पर्यंत अल्ट्रा-लो लेटेंसीसह येतात. गेमिंग सिनारियोजसाठी एक विशेष गेम मोड देखील आहे, जो हेडसेटवर तीन टॅपसह ऑटोमॅटिकली स्विच केला जाऊ शकतो.

Nord Buds CE देखील OnePlus स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी OnePlus Fast Pair फिचर देतो, तर Android वापरकर्ते HeyMelody ऍप डाउनलोड करू शकतात. Nord Buds CE IPX4 वॉटर आणि स्वेट रेसिस्टंट आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :