OnePlus Nord Buds CE लवकरच भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Updated on 22-Jul-2022
HIGHLIGHTS

OnePlus Nord Buds CE लवकरच भारतात लॉन्च होणार

OnePlus Nord Buds CE ची किंमत सुमारे 3,000 रुपये असेल

OnePlus Nord Budsचे सक्सेसर असतील नवीन इयरबड्स

OnePlus ने घोषणा केली आहे की ते लवकरच परवडणारे OnePlus Nord Buds CE TWS इयरबड लॉन्च करणार आहेत. कंपनीने आपल्या ट्विटर हँडलवर त्याचा टीझरही शेअर केला आहे. हे एंट्री-लेव्हल TWS इअरबड्स OnePlus Nord Buds चे सक्सेसरी असतील, जे नुकतेच भारतात 2,799 रुपयांमध्ये लाँच केले गेले आहेत.

हे सुद्धा वाचा : Airtel Black Offer: मोबाईल, DTH आणि ब्रॉडबँड 30 दिवस फ्री, Airtelकडून ग्राहकांना खास भेट

OnePlus NORD BUDS CE लवकरच लाँच होणार

 टीझरनुसार, “इयरफोन स्टेमसह येतील आणि व्हाईट कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असतील. कंपनीच्या अधिकृत विधानानुसार, "Nord Buds CE एंट्री-लेव्हल TWS सेगमेंटमध्ये Nord ची पकड मजबूत करेल. त्याबरोबरच, OnePlus चे ऑडिओ टेक्नॉलॉजी सिग्नेचर बनवण्याचे आणि देशभरातील ऑडिओफाईल्सच्या विस्तृत श्रेणीसाठी अनुभव अधिक सुलभ बनवण्याचे उद्दिष्ट असेल."

याव्यतिरिक्त, कंपनीने OnePlus च्या या इयरबड्सबद्दल सुमारे 3,000 रुपये किंमत टीज केली आहे.

OnePlus Nord Buds च्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये 2.4mm टायटॅनियम डायनॅमिक ड्रायव्हर्स, डॉल्बी ऍटमॉससाठी सपोर्ट, चार मायक्रोफोन आणि एआय-पावर्ड नॉइज रिडक्शन अल्गोरिदम यांचा समावेश आहे. इअरबड्स एकाच चार्जवर 30 तासांपर्यंत एकत्रित प्लेबॅक देतात, असा कंपनीचा दावा आहे. 

 इयरबड्स वनप्लस फ्लॅश चार्जला देखील सपोर्ट करतात. Nord Buds फक्त 10 मिनिट चार्ज केल्यानंतर , वापरकर्त्याला 5 तासांचा ऑडिओ प्लेबॅक मिळतो. याव्यतिरिक्त, OnePlus Nord Buds ला IP55 पाणी आणि घामाच्या विरूद्ध रेट केले जाते.

 

 

 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :