Oneplusने मंगळवारी संध्याकाळी सात वाजता झालेल्या लाँच इव्हेंटमध्ये कंपनीचा नवीन स्वस्त 5G फोन OnePlus Nord CE 3 lite लाँच केला आहे. त्यासोबतच, Oneplus nord buds 2 देखील लाँच केले आहेत. हे नवे बड्स Oneplus nord buds चे अपग्रेड आहे. बघुयात नव्या बड्सची किमंत आणि जबरदस्त फीचर्स
Oneplus च्या या नव्या इयरबड्सची किंमत 2,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या डिवाइसची विक्री 11 एप्रिल 2023 पासून सुरु होणार आहे. हे बड्स ऑफिशियल स्टोअर, फ्लिपकार्ट, ऍमेझॉन इ. ठिकाणी खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत. बड्स ग्रे आणि व्हाईट कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहेत.
Oneplus च्या नव्या बड्समध्ये ऍक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन फिचर तुम्हाला मिळणार आहे. डस्ट आणि वॉटर रेसिस्टंटसाठी यामध्ये IP55 रेटिंग देण्यात आली आहे. बड्सची डिझाईन Oneplus nord buds सारखीच आहे. या बड्ससह तुम्हाला कस्टमायजेबल टच कन्ट्रोल मिळेल. कस्टमायजेबल ऑप्शन्स तुम्ही HeyMelody ऍपद्वारे ऍक्सेस करू शकता. उदा. एक्विलायझर सेटिंग आणि लो लेटेन्सी गेम मोड.
या बड्समध्ये वनप्लस फास्ट पेयर सपोर्ट मिळेल. नव्याने डिझाईन केलेल्या चार्जिंग केसमध्ये तुम्हाला USB टाईप C पोर्ट मिळेल. बड्स फुल चार्जवर सात तासांपर्यंत आणि चाजिंग केससह 36 तासांपर्यंत चालतील, असा दावा करण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये, ब्लूटूथ वर्जन 5.2 चे समर्थन आहे. यासह, वनप्लस स्मार्टफोनवर डॉल्बी ATMOSचे सपोर्ट मिळेल.