तब्बल 44 तास चालणाऱ्या बॅटरीसह OnePlus Buds 3 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Best फीचर्स। Tech News

तब्बल 44 तास चालणाऱ्या बॅटरीसह OnePlus Buds 3 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Best फीचर्स। Tech News
HIGHLIGHTS

OnePlus ने OnePlus Buds 3 देखील भारतात लाँच केले.

OnePlus Buds 3 सिंगल चार्जवर 44 तास वापरता येतात.

नवे बड्स येत्या 6 फेब्रुवारीपासून खरेदीसाठी OnePlus च्या अधिकृत साईट आणि Amazon वर उपलब्ध

OnePlus कंपनीने 23 जानेवारी रोजी वर्षातील पहिला सर्वात मोठा लाँच इव्हेंट आयोजित केला होता. या कार्यक्रमादरम्यान कंपनीने लेटेस्ट OnePlus 12 सिरीज भारतात लाँच केली आहे. स्मार्टफोनसोबतच कंपनीने OnePlus Buds 3 देखील भारतात लाँच केले आहेत. हे कंपनीचे नवीनतम TWS बड्स आहेत. विशेष म्हणजे चार्जिंग केससह 520mAh बॅटरी उपलब्ध आहे, ज्यासह बड्स 44 तास वापरता येतात. जाणून घ्या बड्सची किमंत आणि इतर तपशील.

OnePlus Buds 3 ची भारतीय किंमत

कंपनीने OnePlus Buds 3 ची किंमत 5,499 रुपये इतकी ठेवली आहे. या बड्सची विक्री लवकरच भारतात सुरू होणार आहे. होय, हे बड्स येत्या 6 फेब्रुवारीपासून खरेदीसाठी OnePlus च्या अधिकृत साईट आणि Amazon वर उपलब्ध असतील. या बड्समध्ये शानदार ब्लू आणि मेटॅलिक ग्रे कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत.

OnePlus Buds 3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, OnePlus Buds 3 मध्ये 10.4mm woofer + 6mm tweeter ड्युअल ड्रायव्हर्स उपलब्ध आहेत. या इअरबड्समध्ये 6 मायक्रोफोन आहेत म्हणजेच प्रत्येक बडमध्ये 3 मायक्रोफोन आहेत. OnePlus Buds 3 ला पाण्याच्या संरक्षणासाठी IP55 रेटिंग आहे. यासोबतच गुगल फास्ट पेअरला बड्समध्ये सपोर्ट करण्यात आला आहे. बड्समध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.3 समर्थित आहे, जो 10 मीटरपर्यंत कनेक्टिव्हिटी देतो.

oneplus buds 3

बॅटरी

बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, प्रत्येक इअरबडमध्ये 58mAh बॅटरी असते, तर चार्जिंग केसमध्ये 520mAh बॅटरी असते. बड्स एका चार्जवर ANC सपोर्टसह 6.5 तासांपर्यंत प्लेबॅक देतात, तर चार्जिंग केससह 28 तासांपर्यंत बॅटरी लाईफ देतात. मात्र, ANC बंद असताना हे बड्स 10 तासांपर्यंत टिकतात तर, चार्जिंग केस सपोर्टसह 44 तासांपर्यंत प्लेबॅक टाइम मिळतो. कंपनीचा दावा आहे की, हे इयरबड 10 मिनिटांच्या चार्जिंगवर 7 तास टिकतात, यासाठी USB चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo