Nothing ने Nothing Ear Stick हे भारतासह जागतिक बाजारपेठेत नवीन इयरबड्स म्हणून लाँच केले आहेत . कंपनीचा दावा आहे की नथिंगचे नवीनतम वायरलेस इअरबड्स 7 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक टाइम आणि पूर्ण चार्ज केल्यावर 3 तासांपर्यंत कॉलिंग टाइम देऊ शकतात. तर, चार्जिंग केससह यास 29 तासांपर्यंत एकूण बॅटरी लाईफ मिळेल. कंपनीने नवीन इयरबड्ससाठी प्री-ऑर्डर घेणे सुरू केले आहे. भारतात इअरबड्सची किंमत 8,499 रुपये आहे.
हे Nothing चे तिसरे प्रोडक्ट आहे. नवीन इअरबड सध्याच्या नथिंग इअर (1) पेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत आणि अनेक नवीन फीचर्ससह येतो. चला नवीन इअर स्टिकबद्दल सर्व काही तपशील जाणून घेऊयात…
हे सुद्धा वाचा : भारीच की ! BSNL ने आणले दोन उत्तम रिचार्ज प्लॅन, कॉलिंग आणि डेटासह मिळेल वर्षभराची वैधता
नथिंग इयर स्टिकची किंमत 8,499 रुपये आहे. 17 नोव्हेंबरपासून हे उपकरण Myntra आणि Flipkart वर खुल्या विक्रीद्वारे भारतात खरेदीसाठी उपलब्ध होतील. जे 4 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय उपलब्धतेपेक्षा खूप उशिरा आहे. नथिंग इयर 1 ची व्हाइट व्हेरिएंटसाठी सध्या फ्लिपकार्टवर किंमत 7,299 रुपये आणि ब्लॅक व्हेरिएंटसाठी 8,499 रुपये आहे.
नथिंग इअर स्टिक एक नवीन व्हर्टिकल, सिलेंड्रिकल केससह येतात, जे दिसायला लिपस्टिकसारखे आहे. इअरबड बाहेर काढण्यासाठी केसाला लिपस्टिकसारखे फिरवावे लागेल. केस USB-C चार्जिंग पोर्टसह येतो, मात्र ते वायरलेस चार्जिंग समर्थन देत नाही. यात पारदर्शक झाकण आहे, त्यामुळे तुम्ही ते न उघडता पाहू शकता.
नवीन इअर स्टिकमध्ये 12.6mm डायनॅमिक ड्रायव्हर, AAC आणि SBC कोडेक्ससाठी सपोर्ट आणि स्टेम डिझाइनसह नथिंग सिग्नेचर ट्रान्सपरंट डिझाइन आहे. कंपनीचा दावा आहे की, इअरबड्स 7 तासांपर्यंत ऐकण्याचा वेळ देतात आणि पूर्ण चार्ज केल्यावर 3 तासांपर्यंत कॉलिंग वेळ देतात.
यावेळी कोणत्याही सिलिकॉन टिप्स नाहीत आणि तुम्हाला बटन-बेस्ड जेश्चर मिळेल. इयरबड्स IP54 डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स, इन-इअर डिटेक्शन आणि Google फास्ट पेअर तसेच मायक्रोसॉफ्ट स्विफ्ट पेअरसाठी सपोर्टसह देखील येतात. हे ब्लूटूथ 5.2 ला समर्थन देते आणि Android 5.1 आणि त्यावरील, तसेच iOS 11 आणि त्यावरील वर्जनसोबत कार्य करेल.