Nothing आणतोय नवीन इयरस्टिक्स, फॅशन शोमध्ये दिसली पहिली झलक, बघा किंमत
Nothing नवीन इयरफोन्स लाँच करण्याच्या तयारीत
'Nothing Ear Stick' ची पहिली झलक एका फॅशन शोमध्ये दिसली
जाणून घ्या, Nothing Ear Stick ची संभावित किमंत
पारदर्शक फोनसाठी लोकप्रिय NOTHING आता नवीन इयरफोन्स घेऊन येत आहे. अलीकडेच, एका फॅशन शोमध्ये इयरफोन्सची पहिली झलक अधिकृतपणे दिसली. खरं तर, यूके-आधारित ब्रँड नथिंगचा पुढचा ट्रू वायरलेस स्टिरिओ TWS इअरफोन 'Nothing Ear Stick' फॅशन डिझायनर चेट लो यांच्या सहकार्याने गुरुवारी स्प्रिंग समर 2023 फॅशन शोमध्ये प्रदर्शित करण्यात आले. हे TWS इयरफोन्स 'अत्यंत आरामदायक' असल्याचे म्हटले जाते. मात्र, इअरबड्सचे डिझाइन अद्याप समोर आलेले नाही.
हे सुद्धा वाचा : पहिल्या सेलमध्ये 29,999 रुपयांचा Realme फास्ट चार्जिंग फोन फक्त रु. 6,099 मध्ये खरेदी करा
स्प्रिंग समर 2023 फॅशन शोमध्ये चार्जिंग केसचे डिझाइन उघड करण्यासाठी फॅशन डिझायनर चेट लो यांच्याशी नथिंगने हातमिळवणी केली. कंपनीच्या मते, नथिंग इअर स्टिकमध्ये फेदर-लाइट एर्गोनॉमिक डिझाइन आहे, जे अत्यंत आरामदायक आहे. त्याने कस्टम-मेड नथिंग फोन 1 बॅग देखील सादर केली, जी त्याच्या ग्लिफ इंटरफेसचा उत्सव साजरा करण्यासाठी डिझाइन केलेली असल्याचे मानले जाते.
Nothing Ear Stick ची संभावित किमंत
If the Amazon leak is right, we should see the launch of “Nothing ear (1) Stick” version next week too with the phone (1).
– No Silicon Tips (Like standard AirPods)
– New, Compact Case design
– Same Price (€99)
– Maybe difference in battery life or no ANC?#nothing pic.twitter.com/CueH4dvX4E— Ishan Agarwal (@ishanagarwal24) July 7, 2022
लोकप्रिय टिपस्टर इशान अग्रवालने नथिंग इअर 1 स्टिकचे डिझाइन आणि किंमत टीज केली आहे. EUR 99 म्हणजेच अंदाजे रु. 8,000 च्या किमतीत राहण्यासाठी, Nothing मधील नवीन इयरफोन्सना ANC फीचर मिळणार नाही, असे मानले जाते. कंपनीचे मागील मॉडेल, नथिंग इअर 1 देखील गेल्या वर्षी युरोपमध्ये EUR 99 च्या किमतीत लाँच करण्यात आले होते. या TWS इयरफोन्सची भारतात लाँचच्या वेळी किंमत 5,999 रुपये होती.
सिलिकॉन टिप्सशिवाय येण्याची शक्यता
Ear (stick). Supremely comfortable. Exquisitely unique.
Revealed exclusively on Chet Lo's SS23 runway. pic.twitter.com/lzP3n4cQNR
— Nothing (@nothing) September 22, 2022
नथिंगचा दावा आहे की, नथिंग इअर स्टिकची रचना नथिंग फोन 1 सह चांगले आउटपुट देण्यासाठी केली गेली आहे. शिवाय, नथिंगच्या प्रवक्त्याने हे उघड केले आहे की, इअर स्टिक हे नवीन चार्जिंग केस आणि नवीन बड्स असलेले पूर्णपणे नवीन डिवाइस आहे. कंपनीने स्पष्टपणे इअरबड्स उघड केले नसले तरी चार्जिंग केस पूर्वी लीक झालेल्या डिझाइनसारखेच दिसते. एअरपॉड्स प्रमाणे सिलिकॉन टिप्सशिवाय नथिंग इअर स्टिक येण्याची शक्यता आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile