Noise : तब्बल 50 तासांपर्यंत टिकणाऱ्या बॅटरीसह नवीन इयरबड्स लाँच, किंमतही खूपच कमी
Noise Buds Prima 2 बाजारात लाँच
नवीन बड्सची किंमत एकूण 1,299 रुपये
कंपनीच्या वेबसाइटवरून इयरबड्स खरेदी करता येतील
Noise ने नवीन TWS इयरबड्स Noise Buds Prima 2 बाजारात लाँच केले आहेत. कंपनीचे हे नवीन इयरबड 50 तासांपर्यंत प्लेबॅक टाइम ऑफर करतात. हे बड्स फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 120 मिनिटे टिकतात. Noise Buds 2 Prima ची किंमत 1,299 रुपये आहे. तुम्ही ते कंपनीच्या वेबसाइट आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. हे बड्स कार्बन ब्लॅक, डीप वाईन आणि पर्ल व्हाइट.तीन कलर ऑप्शन्समध्ये येतात.
हे सुद्धा वाचा : Infinix चा नवा दमदार फोन 50MP कॅमेरासह लाँच, सुरुवातीची किंमत 10 हजारांपेक्षा कमी
Noise Buds Prima 2 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
नवीन इअरबड्समध्ये, कंपनी दमदार साउंड कॉलिटीसाठी 10mm इलेक्ट्रो डायनॅमिक ड्रायव्हर्स देत आहे. उत्तम कॉलिंग एक्सपेरियन्ससाठी, यात पर्यावरणीय आवाज रद्दीकरण (ENC) सह क्वाड माइक सेटअप देण्यात आला आहे. बड्समध्ये हायपरसिंक टेक्नॉलॉजी देखील आहे, ज्यामुळे चार्जिंग केस उघडताच इअरबड्स लास्ट टाइम पेयर असतील, त्या डिव्हाइसशी कनेक्ट केले जाऊ शकतात.
कनेक्टिव्हिटीसाठी या बड्समध्ये ब्लूटूथ 5.3 देण्यात आला आहे. वॉटर रेसिस्टन्टसाठी या बड्सना IPX5 रेटिंग मिळाले आहे. कंपनी व्हॉईस कमांडसाठी सिरी आणि गुगल असिस्टंट सपोर्ट देखील देत आहे. यामध्ये तुम्हाला टच कंट्रोल्स देखील मिळतील. ज्याद्वारे तुम्ही फोन कॉल्स रिसिव्ह करू शकता किंवा रिजेक्ट करू शकता. तसेच बड वर टॅप करून साउंड कंट्रोल करता येईल.
नॉईजच्या या बड्समध्ये पावरफुल बॅटरी मिळणार आहे. कंपनीचा दावा आहे की पूर्ण चार्ज केल्यावर, चार्जिंग केस असलेल्या या हे बड्स 50 तासांपर्यंत प्लेबॅक टाइम देतात. बड्सची आणखी एक खास गोष्ट म्हणजे त्यामध्ये इन्स्टाचार्ज टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये हे बड्स 2 तास टिकतात.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile