अगदी स्वस्तात लाँच झाले Mivi चे नवे इयरबड्स! मिळेल तब्बल 50 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप, किंमतही कमी

अगदी स्वस्तात लाँच झाले Mivi चे नवे इयरबड्स! मिळेल तब्बल 50 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप, किंमतही कमी
HIGHLIGHTS

Mivi चे नवीन Mivi SuperPods Dueto इयरबड्स लाँच

Mivi च्या या नवीनतम इयरबड्सची किंमत 1,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

Mivi ने हे इयरबड्स AI सक्षम ENC फिचरसह सज्ज केले आहेत.

तुम्ही नवीन इयरबड्स खरेदी करण्याचा विचार करत आहात? तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध कंपनीने नवीन Mivi SuperPods Dueto इयरबड्स लाँच करण्यात आले आहेत. महत्त्वाच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हे इयरबड्स ड्युअल ड्रायव्हर्स आणि 13 मिमी वूफरसह लाँच करण्यात आले आहेत. हे नवे बड्स 2000 रुपयांच्या जवळपास लाँच करण्यात आले आहेत.

Also Read: Airtel ने देखील वाढवल्या प्लॅन्सच्या किमती! पुढील महिन्यापासून लागू होणार नवे दर, बघा संपूर्ण डिटेल्स

Mivi SuperPods Dueto ची भारतीय किंमत

Mivi च्या या नवीनतम इयरबड्सची किंमत 1,999 रुपये ठेवण्यात आली आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे कंपनीच्या अधिकृत साइट व्यतिरिक्त, हे इयरबड्स ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon आणि Flipkart वरून खरेदी केले जाऊ शकतात.

 Mivi SuperPods Dueto इयरबड्स लाँच करण्यात आले आहेत.

Mivi SuperPods Dueto

इअरबड्समध्ये हाय-लो ड्युअल ड्रायव्हर्स आणि 6mm Tweeter देण्यात आले आहेत, ज्याच्या मदतीने इअरबड्स चांगली साउंड कॉलिटी देतात. तुम्हाला प्रगत इन्स्ट्रुमेंट सेपरेशन आणि 3D डायमेंशन साउंड अनुभव देण्यासाठी, कंपनीने 3D साउंडस्टेजसह हे नवीनतम इयरबड लाँच केले आहेत. तुम्हाला 10 मीटर पर्यंतच्या रेंजसह ब्लूटूथ आवृत्ती 5.3 सपोर्ट देखील मिळेल.

HD कॉलची स्पष्टता सुनिश्चित करण्यासाठी आणि आसपासचा आवाज कमी करण्यासाठी, कंपनीने हे इयरबड्स AI सक्षम ENC फिचरसह सज्ज केले आहेत. गेमिंग प्रेमींच्या गरजा लक्षात घेऊन, कंपनीने एक गेमिंग मोड देखील प्रदान केला आहे, जो अल्ट्रा लो लेटन्सी गेमिंग अनुभव देईल.

याव्यतिरिक्त, इयरबड्स IPX4 वॉटर रेझिस्टंट रेटिंगसह येतात. याशिवाय, तुमच्या सोयीसाठी कंपनीने AI व्हॉईस असिस्टंटलाही सपोर्ट केला आहे. या इयरबड्ससह तुम्हाला मल्टी-डिव्हाइस कनेक्टिव्हिटीची सुविधा देखील मिळेल. तुम्ही एकाच वेळी दोन उपकरणांसह बड कनेक्ट करू शकता. बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाल्यास, हे इअरबड्स पूर्ण चार्ज केल्यावर 50 तासांपर्यंत सपोर्ट करतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo