भारतीय ऑडिओ प्रोडक्ट कंपनी Mivi ने नवीन ट्रूली वायरलेस इयरबड्स लाँच केले आहेत. कंपनीने या प्रोडक्टचे नाव Mivi DuoPods A350 असे ठेवले आहे. हे नवीन इयरबड्स बजेट सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत. जाणून घ्या या नवीनतम डिवाइसबद्दल संपूर्ण माहिती…
हे सुद्धा वाचा : Whatsapp चॅट लपवण्याची युक्ती! सर्वांना माहित असेल फोनचा पासवर्ड, तरीही सुरक्षित राहील चॅट
Mivi DuoPods A350 स्ट्रेट स्टेम आणि इन-इअर डिझाइनसह येतो. यामध्ये 13mm चे मोठे डायनॅमिक ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. त्याची फ्रिक्वेंसी रेंज 20Hz ते 20KHz आहे. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.1 सपोर्ट देण्यात आला आहे.
हे इयरबड्स AAC आणि SBC कोडेक सपोर्टसह येतात. याशिवाय, यात ड्युअल MEMS मायक्रोफोनचाही सपोर्ट देण्यात आला आहे. यामुळे क्रिस्टल क्लिअर कॉलिंगचा अनुभव मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे. या डिव्हाईसमध्ये टच कंट्रोल देखील दिलेले आहेत.
मीडिया प्लेबॅक कंट्रोल करण्यासाठी आणि स्मार्टफोनच्या व्हॉइस असिस्टंटमध्ये ऍक्सेस करण्यासाठी टच कंट्रोल्स वापरतात. यामध्ये प्रत्येक बडमध्ये 40mAh बॅटरी देण्यात आली आहे. एका चार्जवर त्याचा प्लेबॅक टाइम 8.5 तासांचा असल्याचा कंपनीचा दावा आहे. त्याच्या चार्जिंग केसमध्ये 500mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, यामुळे वापरकर्त्यांना एकूण 50 तासांचा प्लेबॅक टाइम मिळतो. चार्जिंगसाठी यात USB टाइप-C पोर्ट आहे. वॉटर रेसिस्टेंटसाठी यामध्ये IPX4 रेटिंग आहे.
Mivi DuoPods A350 Earbuds एकूण 1299 रुपयांमध्ये लाँच करण्यात आले आहेत. मात्र, लाँच प्राईसवर ते 999 रुपयांना खरेदी करता येईल. हे उपकरण ब्लॅक, व्हाइट, मिंट ग्रीन, स्पेस ग्रे आणि ब्लू कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे. हे डिवाइस ई-कॉमर्स साइट Amazon किंवा कंपनीच्या साइटवरून खरेदी करता येईल. येथून खरेदी करा…